S M L

आदर्श प्रकरणी आणखी 4 जणांना अटक ; नेते कधी ?

21 मार्चआदर्श घोटाळा प्रकरणात सीबीआयने आता जोरदार कारवाईला सुरुवात केली. आज आणखी 4 जणांना अटक करण्यात आली. आदर्शचे को-प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी आणि रिटायर्ड मेजर जनरल ए. आर. कुमार यांच्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास यांनासुद्धा सीबीआयने अटक केली. तर, काल अटक केलेल्या तिघांना कोर्टाने सीबीआय कोठडी दिली. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याची संख्या आता 7 झाली. मंगळवारी तीन अधिकार्‍यांना अटक केल्यानंतर आणखी 4 जणांना सीबीआयने बुधवारी अटक केली. त्यात आदर्शचे को प्रमोटर कन्हैय्यालाल गिडवानी, मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास, निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार, निवृत्त मेजर जनरल टी. के. कौल यांचा समावेश आहे. लाचखोरीच्या प्रकरणात मंगळवारी सेशन्स कोर्टाने गिडवानींना जामीन दिला. आर्थर रोडमधून त्यांची सुटका होताच सीबीआयनं पुन्हा त्यांना अटक केली.निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार यांना सीबीआयने हैदराबादमधून अटक केली. कुमार हे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग होते. टी. के. कौलसुद्धा जनरल कमांडिंग ऑफिसर होते. दरम्यान, आर सी ठाकूर, पी व्ही देशमुख आणि एम. एम. वांच्छू यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 31 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली. अधिकार्‍यांवर कारवाई होतेय, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांनी केली. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने धडक कारवाई सुरू केली. सीबीआयच्या या झाडाझडतीत पुढचा नंबर कुणाचा याची उत्सुकता आहे.यांना झाली अटककन्हैयालाल गिडवानी - आदर्श सोसायटीचे को-प्रमोटर- राजकीय वजनाचा पुरेपूर फायदा उठवला- जमीन मिळवण्यात महत्त्वाची भूमिका- सरकारकडून अनेक सवलती मिळवल्या- गिडवानी, त्यांची दोन्ही मुलं सोसायटीचे सदस्यप्रदीप व्यास - मुंबईचे माजी जिल्हाधिकारी - सध्या अर्थखात्याच्या खर्च विभागाचे सचिव - आदर्शच्या सदस्यांच्या खोट्या उत्पन्न दाखल्यांची शहानिशा केली नाही- अपात्र लोकांनाही सोसायटीचं सदस्यत्व दिलं - बदल्यात व्यास यांच्या पत्नीला आदर्शमध्ये फ्लॅटनिवृत्त मेजर जनरल ए.आर. कुमार - लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात विभागाचे माजी जीओसी (GOC) - आदर्शच्या जागेवर रहिवासी इमारत बांधण्यासाठी एनओसी (NOC) दिलं - बदल्यात कुमार यांच्या मुलाला आदर्श सोसायटीत फ्लॅट निवृत्त मेजर जनरल टी.के. कौल - लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात विभागाचे माजी जीओसी - लोकसभेला खोटी माहिती दिली- आदर्शची जमीन लष्कराच्या ताब्यात नसल्याचं सांगितलं- खोटी कागदपत्रं सादर केली- बांधकामावर कारवाई करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं- बदल्यात आदर्शमध्ये फ्लॅट मिळाला

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 06:06 PM IST

आदर्श प्रकरणी आणखी 4 जणांना अटक ; नेते कधी ?

21 मार्च

आदर्श घोटाळा प्रकरणात सीबीआयने आता जोरदार कारवाईला सुरुवात केली. आज आणखी 4 जणांना अटक करण्यात आली. आदर्शचे को-प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी आणि रिटायर्ड मेजर जनरल ए. आर. कुमार यांच्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास यांनासुद्धा सीबीआयने अटक केली. तर, काल अटक केलेल्या तिघांना कोर्टाने सीबीआय कोठडी दिली.

आदर्श घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याची संख्या आता 7 झाली. मंगळवारी तीन अधिकार्‍यांना अटक केल्यानंतर आणखी 4 जणांना सीबीआयने बुधवारी अटक केली. त्यात आदर्शचे को प्रमोटर कन्हैय्यालाल गिडवानी, मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप व्यास, निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार, निवृत्त मेजर जनरल टी. के. कौल यांचा समावेश आहे. लाचखोरीच्या प्रकरणात मंगळवारी सेशन्स कोर्टाने गिडवानींना जामीन दिला. आर्थर रोडमधून त्यांची सुटका होताच सीबीआयनं पुन्हा त्यांना अटक केली.

निवृत्त मेजर जनरल ए. आर. कुमार यांना सीबीआयने हैदराबादमधून अटक केली. कुमार हे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग होते. टी. के. कौलसुद्धा जनरल कमांडिंग ऑफिसर होते. दरम्यान, आर सी ठाकूर, पी व्ही देशमुख आणि एम. एम. वांच्छू यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 31 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली. अधिकार्‍यांवर कारवाई होतेय, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या माजी मुख्यमंत्र्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांनी केली. कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने धडक कारवाई सुरू केली. सीबीआयच्या या झाडाझडतीत पुढचा नंबर कुणाचा याची उत्सुकता आहे.यांना झाली अटक

कन्हैयालाल गिडवानी - आदर्श सोसायटीचे को-प्रमोटर- राजकीय वजनाचा पुरेपूर फायदा उठवला- जमीन मिळवण्यात महत्त्वाची भूमिका- सरकारकडून अनेक सवलती मिळवल्या- गिडवानी, त्यांची दोन्ही मुलं सोसायटीचे सदस्य

प्रदीप व्यास - मुंबईचे माजी जिल्हाधिकारी - सध्या अर्थखात्याच्या खर्च विभागाचे सचिव - आदर्शच्या सदस्यांच्या खोट्या उत्पन्न दाखल्यांची शहानिशा केली नाही- अपात्र लोकांनाही सोसायटीचं सदस्यत्व दिलं - बदल्यात व्यास यांच्या पत्नीला आदर्शमध्ये फ्लॅट

निवृत्त मेजर जनरल ए.आर. कुमार - लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात विभागाचे माजी जीओसी (GOC) - आदर्शच्या जागेवर रहिवासी इमारत बांधण्यासाठी एनओसी (NOC) दिलं - बदल्यात कुमार यांच्या मुलाला आदर्श सोसायटीत फ्लॅट निवृत्त मेजर जनरल टी.के. कौल - लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात विभागाचे माजी जीओसी - लोकसभेला खोटी माहिती दिली- आदर्शची जमीन लष्कराच्या ताब्यात नसल्याचं सांगितलं- खोटी कागदपत्रं सादर केली- बांधकामावर कारवाई करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं- बदल्यात आदर्शमध्ये फ्लॅट मिळाला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 06:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close