S M L

श्रीलंका नरसंहाराविरुध्द भारताचे मतदान

22 मार्चजिनेव्हातल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत श्रीलंकेविरुद्धचा ठराव मंजूर झाला. भारताने श्रीलंकेच्या विरोधात आणि ठरावाच्या बाजूने मतदान केलं. ठरावाच्या बाजूनं 24 मतं पडली. तर 15 देशांनी विरोधात मतदान केलं. 8 देशांचे प्रतिनिधी मतदानाला गैरहजर राहिले. लिट्टेविरोधातल्या युद्धात श्रीलंकेत झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत हा ठराव होता. श्रीलंकेतल्या नरसंहाराचा निषेध करणारा हा ठाराव आहे. अमेरिकेनं हा ठराव मांडला होता. रशिया आणि चीननं या अमेरिकेनं मांडलेल्या या ठरावाला जोरदार विरोध केला. भारतानं श्रीलंकेविरोधात मतदान केलं असलं तरी यामुळे भारत आणि श्रीलंकेच्या संबंधात कटुता येणार नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्र्यांनी दिली. श्रीलंका सरकारनं यावर प्रतिक्रिया दिली,'यावरून असं दिसून आलं की संयुक्त राष्ट्रातील मतदान हे एखाद्या विषयाच्या महत्त्वावरून नाही तर धोरणात्मक आघाड्या आणि देशांतर्गत राजकारणावरून होतं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेची स्थापना ज्या उद्देशासाठी झाली, त्यालाच हरताळ फासण्यात आलाय.'

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 12:48 PM IST

श्रीलंका नरसंहाराविरुध्द भारताचे मतदान

22 मार्च

जिनेव्हातल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत श्रीलंकेविरुद्धचा ठराव मंजूर झाला. भारताने श्रीलंकेच्या विरोधात आणि ठरावाच्या बाजूने मतदान केलं. ठरावाच्या बाजूनं 24 मतं पडली. तर 15 देशांनी विरोधात मतदान केलं. 8 देशांचे प्रतिनिधी मतदानाला गैरहजर राहिले. लिट्टेविरोधातल्या युद्धात श्रीलंकेत झालेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत हा ठराव होता. श्रीलंकेतल्या नरसंहाराचा निषेध करणारा हा ठाराव आहे. अमेरिकेनं हा ठराव मांडला होता. रशिया आणि चीननं या अमेरिकेनं मांडलेल्या या ठरावाला जोरदार विरोध केला. भारतानं श्रीलंकेविरोधात मतदान केलं असलं तरी यामुळे भारत आणि श्रीलंकेच्या संबंधात कटुता येणार नाही, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्र्यांनी दिली.

श्रीलंका सरकारनं यावर प्रतिक्रिया दिली,

'यावरून असं दिसून आलं की संयुक्त राष्ट्रातील मतदान हे एखाद्या विषयाच्या महत्त्वावरून नाही तर धोरणात्मक आघाड्या आणि देशांतर्गत राजकारणावरून होतं आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेची स्थापना ज्या उद्देशासाठी झाली, त्यालाच हरताळ फासण्यात आलाय.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close