S M L

बैलगाडा शर्यतींवर आता पूर्ण बंदी

21 मार्चबैलगाडा शर्यतींवर मुंबई हायकोर्टाने आता पूर्ण बंदी घातली आहे. राज्याच्या अनेक भागात या शर्यती खेळवल्या जातात. त्यात राजकारणीही उतरल्यामुळे या शर्यतींना प्रमाणाबाहेर प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता बैलांबरोबरच कुठल्याही प्राण्यांच्या शर्यती किंवा टक्करी लावता येणार नाही.बैलगाडा शर्यतींचं दृश्य आता दिसणार नाही. मुंबई हायकोर्टाने 12 मार्चच्या आदेशानुसार बैलांच्या शर्यतीवर कायमची बंदी घातली आहे. अशा शर्यतींमध्ये मुक्या प्राण्यांवर अत्याचार होतात अशी याचिका प्राणीमित्र संघटनांनी दाखल केली होती. राज्यातल्या अनेक भागात या शर्यतींवरून मोठं राजकारणही चालतं. वास्तविक बैलांवर अत्याचाराच्या मुद्द्याबरोबरच गरीब शेतकर्‍यांना नादावणारा खेळ अशीही त्यावर टीका झाली, पण हा आमचा पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे त्यावरची बंदी आम्हाला मान्य नाही, असं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे.नेतेमंडळींनाही ही बंदी मान्य असल्याचं दिसत नाही. पारंपरिक खेळ जपायचा की बैलांना जपायचं या कात्रीत हा वादाचा मुद्दा सापडला. अर्थात त्याचा ठोस निर्णय घेणं हे शतकर्‍यांच्याच हातात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 04:22 PM IST

बैलगाडा शर्यतींवर आता पूर्ण बंदी

21 मार्च

बैलगाडा शर्यतींवर मुंबई हायकोर्टाने आता पूर्ण बंदी घातली आहे. राज्याच्या अनेक भागात या शर्यती खेळवल्या जातात. त्यात राजकारणीही उतरल्यामुळे या शर्यतींना प्रमाणाबाहेर प्रसिद्धी मिळाली होती. मात्र आता बैलांबरोबरच कुठल्याही प्राण्यांच्या शर्यती किंवा टक्करी लावता येणार नाही.

बैलगाडा शर्यतींचं दृश्य आता दिसणार नाही. मुंबई हायकोर्टाने 12 मार्चच्या आदेशानुसार बैलांच्या शर्यतीवर कायमची बंदी घातली आहे. अशा शर्यतींमध्ये मुक्या प्राण्यांवर अत्याचार होतात अशी याचिका प्राणीमित्र संघटनांनी दाखल केली होती. राज्यातल्या अनेक भागात या शर्यतींवरून मोठं राजकारणही चालतं. वास्तविक बैलांवर अत्याचाराच्या मुद्द्याबरोबरच गरीब शेतकर्‍यांना नादावणारा खेळ अशीही त्यावर टीका झाली, पण हा आमचा पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे त्यावरची बंदी आम्हाला मान्य नाही, असं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे.

नेतेमंडळींनाही ही बंदी मान्य असल्याचं दिसत नाही. पारंपरिक खेळ जपायचा की बैलांना जपायचं या कात्रीत हा वादाचा मुद्दा सापडला. अर्थात त्याचा ठोस निर्णय घेणं हे शतकर्‍यांच्याच हातात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close