S M L

जि.प.निवडणुकीत राष्ट्रवादीने विश्वासघात केला - माणिकराव ठाकरे

22 मार्चजि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सहकार्य न केल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीने विश्वासघात करत शेवटच्या क्षणी भाजप-सेनेशी हात मिळवणी केल्याचा आरोप माणिकराव ठाकरेंनी केला. राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही माणिकराव ठाकरेंनी केली. यासंदर्भात माणिकराव ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतली. राष्ट्रवादीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केलेली कृत्याचा पाढाच हायकमांडसमोर वाचला. काल बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीचं बहुमत असतानाही राष्ट्रवादीनं अध्यक्षपदासाठी काँग्रेसला बाजूला सारून विरोधकांशी हातमिळवणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीनं शिवसेनेशी हातमिळवणी करीत आपला अध्यक्ष निवडून आणला. अमरावतीत देखिल राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोबत घेऊन आपला अध्यक्ष निवडून आणला. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुध्दा भाजपला बरोबर घेऊन सत्ता मिळवली. राष्ट्रवादीच्या या दगाफटक्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा केंद्रीय स्तरावर लावून धरणार असल्याचं स्पष्ट केलंय.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सोबत जायचं असं ठरलं असताना राष्ट्रवादीनं घेतलेली भूमिका दुर्देवी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. आज माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या भूमिकेचा पाढच वाचला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 22, 2012 10:16 AM IST

जि.प.निवडणुकीत राष्ट्रवादीने विश्वासघात केला - माणिकराव ठाकरे

22 मार्च

जि.प.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सहकार्य न केल्याने काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीने विश्वासघात करत शेवटच्या क्षणी भाजप-सेनेशी हात मिळवणी केल्याचा आरोप माणिकराव ठाकरेंनी केला. राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही माणिकराव ठाकरेंनी केली. यासंदर्भात माणिकराव ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतली. राष्ट्रवादीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केलेली कृत्याचा पाढाच हायकमांडसमोर वाचला.

काल बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीचं बहुमत असतानाही राष्ट्रवादीनं अध्यक्षपदासाठी काँग्रेसला बाजूला सारून विरोधकांशी हातमिळवणी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यवतमाळ जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीनं शिवसेनेशी हातमिळवणी करीत आपला अध्यक्ष निवडून आणला. अमरावतीत देखिल राष्ट्रवादीनं शिवसेनेला सोबत घेऊन आपला अध्यक्ष निवडून आणला. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुध्दा भाजपला बरोबर घेऊन सत्ता मिळवली. राष्ट्रवादीच्या या दगाफटक्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले. खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा केंद्रीय स्तरावर लावून धरणार असल्याचं स्पष्ट केलंय.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सोबत जायचं असं ठरलं असताना राष्ट्रवादीनं घेतलेली भूमिका दुर्देवी अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. आज माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या भूमिकेचा पाढच वाचला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close