S M L

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह ; नववर्षाचं जल्लोषात स्वागत

23 मार्चशांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकीळेच्या सुरुवाती सोबत चैत्र पाडवा दारी आला...मराठी वर्षाचा पहिला दिवस-चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारुन, दाराला तोरण बांधून,गारवा देणार्‍या ,औषधी असणार्‍या कडुनिंबाची कोवळी पानं गुढीसोबत बांधून पूजा केली जाते. नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ,नवे कोरे कापड आणि गडू तांब्या असे त्यावर बांधून काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. रामयणात उल्लेख आहे त्यानुसार 14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला अशी आख्यायिका आहे.म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असं म्हटलं जातं. चांगली वेळ म्हणजे मुहुर्त गुढी पाडवा हा उत्तम मुहुर्त समजला जातो.आज मुंबईतील वरळीमध्ये शिवसह्याद्री फाउंडेशनने सकाळी भव्य शोभा यात्रा काढली. या यात्रेत लेझीम पथकं, ढोल ताश्याच्या निनादाने अस्मान दणाणून गेले. महत्वाचं म्हणजे या यात्रेत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संदेश देण्यात आला. नागरिक उत्साहाने या शोभायेत्रात सहभागी झाले होते.तर ठाणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशीही ठाणेकरांनी मोठ्या जल्लोषात ठिकठिकाणी गुढी उभारून आपला आनंद साजरा केला. दरवर्षी प्रमाणे कोपिनेश्वर महाराजांची पालखी काढत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी 45 चित्ररथ या स्वागत यात्रेत सामील झाले होते. ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर या स्वागत यात्रेला प्रतिसाद दिला.सांस्कृती शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात मैत्रेय फाउंडेशनने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर ग्रंथदिंडी काढण्यात आली होती, वेगवेगळी पुस्तकं, मराठी ग्रंथ या दिंडीत ठेवण्यात आली होती. देऊळ चित्रपटाचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी,मंगेश तेंडुलकर असे मान्यवर या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्यातही मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलं होतं. पारंपारिक वेषभूषेत वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. ढोलताशे आणि लेझीमच्या तालावर लहान थोरांनी सहभाग घेतला. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे ,उंट,घोडे आणि पालख्या यांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला.यावेळी इथल्या कोळी समाजाने पारंपारिक वेशभूषा करून शोभायात्रेत सहभाग घेतला. तर कोल्हापूर जिल्ह्यातील येळवडे गावात सासनकाठ्यांची मिरवणूक काढली जाते. पाडव्याच्या आदल्या दिवशी गावात अंबाबाई देवीची यात्रा भरते आणि नंतर लगबग सुरु होते ती सासनकाठ्यांची मिरवणूक काढण्यासाठी. ही सासनकाठी म्हणजे नववर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोपाचं प्रतीक मानलं जातं. ही परंपरा गेल्या पन्नासहुन अधिक वर्षापासून जपली आहे. सासनकाठ्यांच्या या मिरवणुकीमध्ये विविध पारंपारीक वाद्यांबरोबर लोककलेचा सहभाग असतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 23, 2012 10:10 AM IST

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह ; नववर्षाचं जल्लोषात स्वागत

23 मार्च

शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकीळेच्या सुरुवाती सोबत चैत्र पाडवा दारी आला...मराठी वर्षाचा पहिला दिवस-चैत्र शुद्ध प्रतिपदा. हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारुन, दाराला तोरण बांधून,गारवा देणार्‍या ,औषधी असणार्‍या कडुनिंबाची कोवळी पानं गुढीसोबत बांधून पूजा केली जाते. नवीन आलेल्या कोवळ्या बांबूला फुलांची माळ,नवे कोरे कापड आणि गडू तांब्या असे त्यावर बांधून काठी विजयाचा ध्वज म्हणून घरासमोर उभी करतात. रामयणात उल्लेख आहे त्यानुसार 14 वर्षांच्या वनवासानंतर प्रभु रामचंद्र गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्येला परत आले. रावणाचा पराभव झाल्याने आणि राम अयोध्येत परतल्याने लोकांनी विजय साजरा केला अशी आख्यायिका आहे.म्हणून हा दिवस आनंदाचा, चांगल्या कामाचा असं म्हटलं जातं. चांगली वेळ म्हणजे मुहुर्त गुढी पाडवा हा उत्तम मुहुर्त समजला जातो.

आज मुंबईतील वरळीमध्ये शिवसह्याद्री फाउंडेशनने सकाळी भव्य शोभा यात्रा काढली. या यात्रेत लेझीम पथकं, ढोल ताश्याच्या निनादाने अस्मान दणाणून गेले. महत्वाचं म्हणजे या यात्रेत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी संदेश देण्यात आला. नागरिक उत्साहाने या शोभायेत्रात सहभागी झाले होते.

तर ठाणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशीही ठाणेकरांनी मोठ्या जल्लोषात ठिकठिकाणी गुढी उभारून आपला आनंद साजरा केला. दरवर्षी प्रमाणे कोपिनेश्वर महाराजांची पालखी काढत नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी 45 चित्ररथ या स्वागत यात्रेत सामील झाले होते. ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणावर या स्वागत यात्रेला प्रतिसाद दिला.

सांस्कृती शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यात मैत्रेय फाउंडेशनने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर ग्रंथदिंडी काढण्यात आली होती, वेगवेगळी पुस्तकं, मराठी ग्रंथ या दिंडीत ठेवण्यात आली होती. देऊळ चित्रपटाचा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी,मंगेश तेंडुलकर असे मान्यवर या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.

रायगड जिल्ह्यातही मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलं होतं. पारंपारिक वेषभूषेत वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. ढोलताशे आणि लेझीमच्या तालावर लहान थोरांनी सहभाग घेतला. मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे ,उंट,घोडे आणि पालख्या यांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला.यावेळी इथल्या कोळी समाजाने पारंपारिक वेशभूषा करून शोभायात्रेत सहभाग घेतला.

तर कोल्हापूर जिल्ह्यातील येळवडे गावात सासनकाठ्यांची मिरवणूक काढली जाते. पाडव्याच्या आदल्या दिवशी गावात अंबाबाई देवीची यात्रा भरते आणि नंतर लगबग सुरु होते ती सासनकाठ्यांची मिरवणूक काढण्यासाठी. ही सासनकाठी म्हणजे नववर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाला निरोपाचं प्रतीक मानलं जातं. ही परंपरा गेल्या पन्नासहुन अधिक वर्षापासून जपली आहे. सासनकाठ्यांच्या या मिरवणुकीमध्ये विविध पारंपारीक वाद्यांबरोबर लोककलेचा सहभाग असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 23, 2012 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close