S M L

'आदर्श' नेते येणार अडचणीत ?

24 मार्चआदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात आता मोठे मासेही अडचणीत यायला सुरुवात झाली आहे. जमिनीची मालकी आणि आरक्षण वगळता इतर परवानग्यांच्या बाबतीत स्पष्टिकरणासाठी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना साक्षीसाठी न्यायालयीन आयोगासमोर हजर राहावं लागणार अशी माहिती सूत्रांनी आबीएन-लोकमतला दिली. त्यामुळे अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव निलंगेकर अडचणीत येणार आहेत. विधिमंडळ आणि संसदेचं अधिवेश झाल्यानंतर या साक्षी होणार आहेत. दरम्यान, आदर्शचा भूखंड कोणाच्या मालकीचा आणि त्यावर कुठलं आरक्षण होतं का, या दोन मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारा अंतरीम अहवाल आयोगाकडून लवकरच राज्य सरकारला सादर करणार आहे. चालू अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात म्हणजेच एप्रिल मध्यात सादर होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2012 09:19 AM IST

'आदर्श' नेते येणार अडचणीत ?

24 मार्च

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात आता मोठे मासेही अडचणीत यायला सुरुवात झाली आहे. जमिनीची मालकी आणि आरक्षण वगळता इतर परवानग्यांच्या बाबतीत स्पष्टिकरणासाठी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना साक्षीसाठी न्यायालयीन आयोगासमोर हजर राहावं लागणार अशी माहिती सूत्रांनी आबीएन-लोकमतला दिली. त्यामुळे अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव निलंगेकर अडचणीत येणार आहेत. विधिमंडळ आणि संसदेचं अधिवेश झाल्यानंतर या साक्षी होणार आहेत. दरम्यान, आदर्शचा भूखंड कोणाच्या मालकीचा आणि त्यावर कुठलं आरक्षण होतं का, या दोन मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणारा अंतरीम अहवाल आयोगाकडून लवकरच राज्य सरकारला सादर करणार आहे. चालू अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात म्हणजेच एप्रिल मध्यात सादर होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2012 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close