S M L

शेतकर्‍यांची फसवणूक, 300 एकर बिनशेती म्हणून विकली !

दीप्ती राऊत, नाशिक24 मार्चसध्या जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. बिल्डर, एजंट आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमतात भरडला जातोय मूळ मालक शेतकरी आणि आयुष्याची पुंजी लावून घरासाठी जागा खरेदी करणारा सामान्य ग्राहक. असाच एक प्रकार उघडकीस आलाय नाशिकजवळच्या काही गावांमध्ये...नाशिकच्या वेशीवर असलेल्या सैय्यद पिंप्री, ओढा आणि विंचूरगवळी गावातले हे शेतकरी गेल्या 5 वर्षांपासून पुरावे गोळा करताहेत, त्यांच्या जमिनींचे नेमकं झालंय काय याचे...तब्बल साडेचारशे शेतकर्‍यांची 300 एकर जमीन परस्परच बिनशेती झाली, तिचे प्लॉट पडले आणि विकलेही गेले.तक्रारदार शेतकरी सचिन रिकामे म्हणतात, आमची जमीन, आम्ही अर्ज केला नाही मग ही बिनशेती कशी झाली ? आम्ही आरटीआयखाली माहिती मागितली तर कळालं नाशिकचा बिल्डर विक्रांत हॅपी होम याने मुख्यत्यारपत्र केलीत. तेव्हाचे अपर जिल्हाधिकारी विलास ठाकूर यांनी आदेश दिले होते. 95 पूर्वी मयत झालेल्यांच्या सह्या, अंगठे त्यात आहेत.तसेच तुकाराम आणि सोमनाथ रिकामे. यांची आजी चंद्रभागा 86मध्ये मयत झाली. पण तिच्यानावे 95 मध्ये मुख्त्यारपत्र करण्यात आलंय. अशी एक दोन नाही तब्बल 25 नावं या शेतकर्‍यांनी शोधून काढलीत, जे मयत आहेत पण त्यांच्या नावे खोटी मुख्त्यारपत्र करण्यात आली आहे. एकीकडे पाटाच्या पाण्यावर अशी ही हिरवी पिकं आजही उभी आहेत, पण सरकार दफ्तरी ही जमीन बिनशेती आहे. यात फसवणूक होतेय ती कसणार्‍या शेतकर्‍याची आणि हे प्लॉट खरेदी करणार्‍या ग्राहकाची.आता यांना सामना करावा लागतोय तो हे प्लॉट विकणार्‍या दलालांचा आणि डेव्हलपर्सचा. या ठिकाणी 500 च्यावर प्लॉट पाडले आहेत. काहींची विक्री झाली, काहींची सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी खरेदी करणार्‍यांना अद्याप खरेदी खतं मिळाली नाहीत. फसवले गेलेले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेटा मारताहेत.सरपंच दत्तात्रेय रिकामे म्हणतात, आम्ही कलेक्टरकडे अर्ज दिले. त्यांची वेळ घेतली, 4 वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, कधी कॉप्रोरेशन गेले सांगायचे कधी मंत्री आले म्हणून सांगायचे. शासकीय अधिकार्‍यांसमक्ष मुखत्यारपत्र व्हायला हवं मग ते रोटरीकडे का झालं ? याच गैरव्यवहार झाला.जमिनीचे व्यवहार नियमानुसार व्हावेत म्हणून ज्यांना अधिकार दिलेत तेच शेत खात असतील तर न्याय मागायचा कुणाकडे अशी या शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2012 10:58 AM IST

शेतकर्‍यांची फसवणूक, 300 एकर बिनशेती म्हणून विकली !

दीप्ती राऊत, नाशिक

24 मार्च

सध्या जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. बिल्डर, एजंट आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमतात भरडला जातोय मूळ मालक शेतकरी आणि आयुष्याची पुंजी लावून घरासाठी जागा खरेदी करणारा सामान्य ग्राहक. असाच एक प्रकार उघडकीस आलाय नाशिकजवळच्या काही गावांमध्ये...

नाशिकच्या वेशीवर असलेल्या सैय्यद पिंप्री, ओढा आणि विंचूरगवळी गावातले हे शेतकरी गेल्या 5 वर्षांपासून पुरावे गोळा करताहेत, त्यांच्या जमिनींचे नेमकं झालंय काय याचे...तब्बल साडेचारशे शेतकर्‍यांची 300 एकर जमीन परस्परच बिनशेती झाली, तिचे प्लॉट पडले आणि विकलेही गेले.

तक्रारदार शेतकरी सचिन रिकामे म्हणतात, आमची जमीन, आम्ही अर्ज केला नाही मग ही बिनशेती कशी झाली ? आम्ही आरटीआयखाली माहिती मागितली तर कळालं नाशिकचा बिल्डर विक्रांत हॅपी होम याने मुख्यत्यारपत्र केलीत. तेव्हाचे अपर जिल्हाधिकारी विलास ठाकूर यांनी आदेश दिले होते. 95 पूर्वी मयत झालेल्यांच्या सह्या, अंगठे त्यात आहेत.

तसेच तुकाराम आणि सोमनाथ रिकामे. यांची आजी चंद्रभागा 86मध्ये मयत झाली. पण तिच्यानावे 95 मध्ये मुख्त्यारपत्र करण्यात आलंय. अशी एक दोन नाही तब्बल 25 नावं या शेतकर्‍यांनी शोधून काढलीत, जे मयत आहेत पण त्यांच्या नावे खोटी मुख्त्यारपत्र करण्यात आली आहे. एकीकडे पाटाच्या पाण्यावर अशी ही हिरवी पिकं आजही उभी आहेत, पण सरकार दफ्तरी ही जमीन बिनशेती आहे. यात फसवणूक होतेय ती कसणार्‍या शेतकर्‍याची आणि हे प्लॉट खरेदी करणार्‍या ग्राहकाची.

आता यांना सामना करावा लागतोय तो हे प्लॉट विकणार्‍या दलालांचा आणि डेव्हलपर्सचा. या ठिकाणी 500 च्यावर प्लॉट पाडले आहेत. काहींची विक्री झाली, काहींची सुरू आहे. 10 वर्षांपूर्वी खरेदी करणार्‍यांना अद्याप खरेदी खतं मिळाली नाहीत. फसवले गेलेले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खेटा मारताहेत.

सरपंच दत्तात्रेय रिकामे म्हणतात, आम्ही कलेक्टरकडे अर्ज दिले. त्यांची वेळ घेतली, 4 वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, कधी कॉप्रोरेशन गेले सांगायचे कधी मंत्री आले म्हणून सांगायचे. शासकीय अधिकार्‍यांसमक्ष मुखत्यारपत्र व्हायला हवं मग ते रोटरीकडे का झालं ? याच गैरव्यवहार झाला.

जमिनीचे व्यवहार नियमानुसार व्हावेत म्हणून ज्यांना अधिकार दिलेत तेच शेत खात असतील तर न्याय मागायचा कुणाकडे अशी या शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2012 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close