S M L

शिस्त केवळ राष्ट्रवादीने पाळायची का? - शरद पवार

24 मार्च जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसनंच आघाडीचा धर्म पाळला नाही. आघाडीमध्ये शिस्त केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनं पाळायची का? हे बरोबर नाही,असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. कोल्हापूर आणि पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनंच आघाडीचा धर्म पाळला नाही. आम्हाला हा वाद पुढं वाढवायचा नाही, असंही पवार म्हणाले. पण, अशाच गोष्टी पुन्हा घडल्या तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पवारांनी दिला. शरद पवार पुण्यात बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला सहकारी पक्ष काँग्रेसला अस्मान दाखवले. यामुळे दुखी झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीने दगा दिला अशी प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादी पक्ष आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, असा आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केला. राष्ट्रवादीने त्यांचं चिन्ह बदलून आता खंजीर करावं असा टोलाही मारला. तर आज खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्य काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या भेटी घेतल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपसोबत जाऊन काँग्रेसला दगा दिला. अशी तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली अशी माहिती सूत्रांनी दिली. आघाडी रंगलेला कलगीतुरा थांबवण्यासाठी आज शरद पवार यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसनेच आघाडीचा धर्म पाळला नाही. आघाडीमध्ये शिस्त केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनं पाळायची का? हे बरोबर नाही, असा सवाल शरद पवारांनी विचारला. आम्हाला हा वाद पुढं वाढवायचा नाही, पण, अशाच गोष्टी पुन्हा घडल्या तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पवारांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 24, 2012 04:08 PM IST

शिस्त केवळ राष्ट्रवादीने पाळायची का? - शरद पवार

24 मार्च

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसनंच आघाडीचा धर्म पाळला नाही. आघाडीमध्ये शिस्त केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनं पाळायची का? हे बरोबर नाही,असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. कोल्हापूर आणि पुण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनंच आघाडीचा धर्म पाळला नाही. आम्हाला हा वाद पुढं वाढवायचा नाही, असंही पवार म्हणाले. पण, अशाच गोष्टी पुन्हा घडल्या तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पवारांनी दिला. शरद पवार पुण्यात बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपला सहकारी पक्ष काँग्रेसला अस्मान दाखवले. यामुळे दुखी झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीने दगा दिला अशी प्रतिक्रिया दिली. तर राष्ट्रवादी पक्ष आता धर्मनिरपेक्ष राहिला नाही, असा आरोप प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केला. राष्ट्रवादीने त्यांचं चिन्ह बदलून आता खंजीर करावं असा टोलाही मारला. तर आज खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राज्य काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या भेटी घेतल्या. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपसोबत जाऊन काँग्रेसला दगा दिला. अशी तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली अशी माहिती सूत्रांनी दिली. आघाडी रंगलेला कलगीतुरा थांबवण्यासाठी आज शरद पवार यांनी काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसनेच आघाडीचा धर्म पाळला नाही. आघाडीमध्ये शिस्त केवळ राष्ट्रवादी काँग्रेसनं पाळायची का? हे बरोबर नाही, असा सवाल शरद पवारांनी विचारला. आम्हाला हा वाद पुढं वाढवायचा नाही, पण, अशाच गोष्टी पुन्हा घडल्या तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही पवारांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 24, 2012 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close