S M L

सरकार मुकबधीर झालंय -अण्णा

25 मार्चदेशात भ्रष्टाचारामुळे अनेक लोकांची हत्या झाली त्यांच्या बायका-पोर आजही रडत आहे पण त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नाही मुळात हे सरकार मुकबधीर झाले आहे त्यांना कोणतीच संवेदनशीलता राहिली नाही असा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. आज जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन सुरू केलंय. सक्षम व्हिसलब्लोअर विधेयकासाठी अण्णांनी जंतर मंतरवर एक दिवसाच्या उपोषणाला बसले आहे. भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवणार्‍या व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी सशक्त व्हिसलब्लोअर विधेयक आणावे अशी मागणी अण्णांनी केली. आज सकाळी सर्वप्रथम अण्णांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अण्णा जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी भ्रष्टाचाराविरूध्द लढताना शहीद झालेलेल्यांना श्रध्दांजली वाहिण्यात आली. अण्णांच्या या आंदोलनात भ्रष्टाचाराविरुद्ध लढतांना शहीद झालेल्या आरटीआय कार्यकर्त्यांचे नातेवाईक सहभागी झाले आहेत. तसंच टीम अण्णांचे सदस्यही या आंदोलनासाठी उपस्थित आहेत. तर अण्णांना पाठिंबा द्यायला कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडेही उपस्थित होते. कोणी कितीही खोट्‌या अफवा पसरवल्या तरी आपण टीम अण्णांचे सदस्य आहोत,असं त्यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 25, 2012 10:24 AM IST

सरकार मुकबधीर झालंय -अण्णा

25 मार्च

देशात भ्रष्टाचारामुळे अनेक लोकांची हत्या झाली त्यांच्या बायका-पोर आजही रडत आहे पण त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचत नाही मुळात हे सरकार मुकबधीर झाले आहे त्यांना कोणतीच संवेदनशीलता राहिली नाही असा आरोप जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला.

आज जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन सुरू केलंय. सक्षम व्हिसलब्लोअर विधेयकासाठी अण्णांनी जंतर मंतरवर एक दिवसाच्या उपोषणाला बसले आहे. भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवणार्‍या व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी सशक्त व्हिसलब्लोअर विधेयक आणावे अशी मागणी अण्णांनी केली. आज सकाळी सर्वप्रथम अण्णांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अण्णा जंतरमंतरवर पोहोचले. यावेळी भ्रष्टाचाराविरूध्द लढताना शहीद झालेलेल्यांना श्रध्दांजली वाहिण्यात आली. अण्णांच्या या आंदोलनात भ्रष्टाचाराविरुद्ध लढतांना शहीद झालेल्या आरटीआय कार्यकर्त्यांचे नातेवाईक सहभागी झाले आहेत. तसंच टीम अण्णांचे सदस्यही या आंदोलनासाठी उपस्थित आहेत. तर अण्णांना पाठिंबा द्यायला कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडेही उपस्थित होते. कोणी कितीही खोट्‌या अफवा पसरवल्या तरी आपण टीम अण्णांचे सदस्य आहोत,असं त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 25, 2012 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close