S M L

उजनीची भीमा नदी प्रदुषणाच्या विळख्यात

28 मार्चउजनीची भीमा नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. दूषित पाणी आणि बेसुमार वाळु उपसा यामुळे या भागातील शेती तर धोक्यात आलीच आहे. पण नागरीकांना गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतंय. भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या या भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पात्रात कारखान्यांनी सोडलेल्या दुषित पाण्याने प्रदुषणाच्या गंभीर समस्येनं उग्र रुप धारण केलंय. याच नदीच्या काठावर भीमाशंकर, सिद्दटेक, गंगापूर आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्र आहेत. या नदीवरील उजनी धरणावर दरवर्षी हजारो परदेशी पक्षी येतात. पण यंदा मात्र हे पक्षी गायब झाले आहे. उजनी धरणाच्या काठावरील इंदापूर, दौंड, श्रीगोंदा तालुक्यातील 86 गावात या दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. तर प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल सामाजिक संघटना करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 28, 2012 02:20 PM IST

उजनीची भीमा नदी प्रदुषणाच्या विळख्यात

28 मार्च

उजनीची भीमा नदी प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. दूषित पाणी आणि बेसुमार वाळु उपसा यामुळे या भागातील शेती तर धोक्यात आलीच आहे. पण नागरीकांना गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतंय. भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या या भीमा अर्थात चंद्रभागा नदीच्या पात्रात कारखान्यांनी सोडलेल्या दुषित पाण्याने प्रदुषणाच्या गंभीर समस्येनं उग्र रुप धारण केलंय. याच नदीच्या काठावर भीमाशंकर, सिद्दटेक, गंगापूर आणि पंढरपूर ही तीर्थक्षेत्र आहेत. या नदीवरील उजनी धरणावर दरवर्षी हजारो परदेशी पक्षी येतात. पण यंदा मात्र हे पक्षी गायब झाले आहे. उजनी धरणाच्या काठावरील इंदापूर, दौंड, श्रीगोंदा तालुक्यातील 86 गावात या दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. तर प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल सामाजिक संघटना करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 28, 2012 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close