S M L

मनसेच्या हातावर 'घड्याळ'

29 मार्चठाण्यात जनादेश हा महायुतीच्या बाजूने होता म्हणून सेनेला पाठिंबा दिला पण त्यांनी मनसेला गृहित धरलं आणि वेडेवाकडे निर्णय घेतले आमचा पाठिंबा असून बसपाला कमिटमेंट दिले त्यामुळे अशा निर्णयाला मी विरोध करतो यासाठी स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. ठाण्यात महापौराच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा देत नव्या समिकरणाला जन्म दिला. पण नाशिकमध्ये शिवसेनेनं तटस्थ राहुन मनसेपासून चार हात दूर राहिले. मग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेनंही औरंगाबाद,ठाण्यात आघाडीला पाठिंबा देत समिकरणच उलटवून लावले आणि आता ठाण्याच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत पुन्हा महायुतीच्या गाडीतून उतरून मनसेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. आज ठाण्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राज आणि आव्हाड यांच्यात जवळपास 40 मिनिटं चर्चा चालली होती. या भेटीनंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत युतीवर हल्लाबोल केला. ठाण्यात जनादेश होता म्हणून युतीला पाठिंबा दिला पण यांनी आम्हाला गृहित धरलं.स्थायी समितीच्या निवडणुकाजवळ आल्या तरी यांच्या काही हालचाली होत नव्हत्या तेंव्हा मीच एकनाथ शिंदे यांनी फोन करून विचारले तेंव्हा त्यांनी आम्ही बसपाला कमिटमेंट दिलं आहे असं सांगितलं. कोणता तरी उत्तरप्रदेशहुन आलेल्या पक्षाला मी बिलकुल पाठिंबा देणार नाही. मुळात सेनेच्या नेत्यांना ऐनवेळेवर जाग येते आणि मग सगळ्यांच्या मागे लागतात. पण स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देणार असं राज ठाकरे यांनी जाहीर करुन युतीच्या गाडीतून हवाच काढून घेतली. तसेच यांनी नाशिकामध्ये पाठिंबा दिला नाही म्हणून याचा वचपा काढणार इतका कोता, छोटा मी नाही आहे आणि राष्ट्रवादीला सुध्दा फक्त स्थायी समितीपर्यंत पाठिंबा आहे. त्यांनी असं काही समजू नये की मनसेचे नगरसेवक खिश्यात जातील असा विचार सुध्दा करू नका असंही राज यांनी ठणकावून सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 29, 2012 09:41 AM IST

मनसेच्या हातावर 'घड्याळ'

29 मार्च

ठाण्यात जनादेश हा महायुतीच्या बाजूने होता म्हणून सेनेला पाठिंबा दिला पण त्यांनी मनसेला गृहित धरलं आणि वेडेवाकडे निर्णय घेतले आमचा पाठिंबा असून बसपाला कमिटमेंट दिले त्यामुळे अशा निर्णयाला मी विरोध करतो यासाठी स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहोत असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

ठाण्यात महापौराच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेला पाठिंबा देत नव्या समिकरणाला जन्म दिला. पण नाशिकमध्ये शिवसेनेनं तटस्थ राहुन मनसेपासून चार हात दूर राहिले. मग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेनंही औरंगाबाद,ठाण्यात आघाडीला पाठिंबा देत समिकरणच उलटवून लावले आणि आता ठाण्याच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत पुन्हा महायुतीच्या गाडीतून उतरून मनसेनं राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. आज ठाण्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. राज आणि आव्हाड यांच्यात जवळपास 40 मिनिटं चर्चा चालली होती. या भेटीनंतर राज यांनी पत्रकार परिषद घेत युतीवर हल्लाबोल केला. ठाण्यात जनादेश होता म्हणून युतीला पाठिंबा दिला पण यांनी आम्हाला गृहित धरलं.

स्थायी समितीच्या निवडणुकाजवळ आल्या तरी यांच्या काही हालचाली होत नव्हत्या तेंव्हा मीच एकनाथ शिंदे यांनी फोन करून विचारले तेंव्हा त्यांनी आम्ही बसपाला कमिटमेंट दिलं आहे असं सांगितलं. कोणता तरी उत्तरप्रदेशहुन आलेल्या पक्षाला मी बिलकुल पाठिंबा देणार नाही. मुळात सेनेच्या नेत्यांना ऐनवेळेवर जाग येते आणि मग सगळ्यांच्या मागे लागतात. पण स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा देणार असं राज ठाकरे यांनी जाहीर करुन युतीच्या गाडीतून हवाच काढून घेतली. तसेच यांनी नाशिकामध्ये पाठिंबा दिला नाही म्हणून याचा वचपा काढणार इतका कोता, छोटा मी नाही आहे आणि राष्ट्रवादीला सुध्दा फक्त स्थायी समितीपर्यंत पाठिंबा आहे. त्यांनी असं काही समजू नये की मनसेचे नगरसेवक खिश्यात जातील असा विचार सुध्दा करू नका असंही राज यांनी ठणकावून सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2012 09:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close