S M L

हिरानंदानींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

30 मार्चसरकारी नियमाप्रमाणे बांधकाम न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज हिरानंदानींना दणका दिला. मुंबई हायकोर्टाने हिरानंदानींवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात हिरानंदानींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. आता एमएमआरडीए हिरानंदानींवर गुन्हे नोंदवण्याची प्रकिया सुरू करू शकते.मुंबई येथील हिरानंदानी बिल्डर्स यांना पवईमध्ये बांधकाम करायला हायकोर्टाने या अगोदरच मनाई केली आहे. हिरानंदानी यांनी तिथं सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका मुंबई हायकोर्टाने ठेवला. याच बरोबर 400 आणि 800 स्क्वेअर फुटाचे प्रत्येकी पंधराशे घरं बांधून ते मध्यमवर्गीयांना देण्याचे आदेश हायकोर्टाने हिरानंदानींना दिले होते. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी हिरानंदानी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र तिथंही कोर्टाने दिलासा दिला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 10:54 AM IST

हिरानंदानींची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

30 मार्च

सरकारी नियमाप्रमाणे बांधकाम न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज हिरानंदानींना दणका दिला. मुंबई हायकोर्टाने हिरानंदानींवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात हिरानंदानींनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. आता एमएमआरडीए हिरानंदानींवर गुन्हे नोंदवण्याची प्रकिया सुरू करू शकते.

मुंबई येथील हिरानंदानी बिल्डर्स यांना पवईमध्ये बांधकाम करायला हायकोर्टाने या अगोदरच मनाई केली आहे. हिरानंदानी यांनी तिथं सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका मुंबई हायकोर्टाने ठेवला. याच बरोबर 400 आणि 800 स्क्वेअर फुटाचे प्रत्येकी पंधराशे घरं बांधून ते मध्यमवर्गीयांना देण्याचे आदेश हायकोर्टाने हिरानंदानींना दिले होते. हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी हिरानंदानी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली मात्र तिथंही कोर्टाने दिलासा दिला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close