S M L

सिंधुदुर्गात मायनिंगवरून संघर्ष पेटला

दिनेश केळुस्कर, सिंधुदुर्ग 30 मार्चसिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या झोळंबे गावात होऊ घातलेल्या मायनिंगवरून संघर्ष पेटला आहे. या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला पर्यावरण अहवाल खोटा आणि सदोष असल्याचं गावकर्‍यांना आढळून आलंय. त्यामुळे 11 एप्रिलला होणारी जनसुनावणी रद्द करण्यात यावी अशी मागणी झोळंबेच्या गावकर्‍यांनी केली.फळ बागायतीसाठी समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गातल्या झोळंबे गावात गोव्याच्या धेंपो कंपनीचा मायनिंग प्रकल्प येतोय. यासाठी दिल्लीच्या मीनलेक कन्सल्टन्सी या खाजगी एजन्सीने पर्यावरण अहवाल तयार केलाय. पण हा अहवाल खोटा आहे, असं गावकर्‍यांचं म्हणणं आहे.मुळात खोटा इआयए हेच खरं तर बेकायदेशीर मायनिंगची सुरूवात आहे. हा अहवाल तयार होताना गावकर्‍यांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असाही त्यांचा आरोप आहे. कोकणातल्या मायनिंग आणि औष्णिक वीज प्रकल्पांसाठी तयार करण्यात आलेले पर्यावरण अहवाल सदोष आहेत असं केंद्राने नेमलेल्या गाडगीळ समितीनेही नमूद केलंय. पण तरीही अशा प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालय ना हरकत प्रमाणपत्र का देतं हा सवाल झोळंबेच्या गावकर्‍यानी विचारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 30, 2012 11:21 AM IST

सिंधुदुर्गात मायनिंगवरून संघर्ष पेटला

दिनेश केळुस्कर, सिंधुदुर्ग

30 मार्च

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या झोळंबे गावात होऊ घातलेल्या मायनिंगवरून संघर्ष पेटला आहे. या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला पर्यावरण अहवाल खोटा आणि सदोष असल्याचं गावकर्‍यांना आढळून आलंय. त्यामुळे 11 एप्रिलला होणारी जनसुनावणी रद्द करण्यात यावी अशी मागणी झोळंबेच्या गावकर्‍यांनी केली.

फळ बागायतीसाठी समृद्ध असलेल्या सिंधुदुर्गातल्या झोळंबे गावात गोव्याच्या धेंपो कंपनीचा मायनिंग प्रकल्प येतोय. यासाठी दिल्लीच्या मीनलेक कन्सल्टन्सी या खाजगी एजन्सीने पर्यावरण अहवाल तयार केलाय. पण हा अहवाल खोटा आहे, असं गावकर्‍यांचं म्हणणं आहे.

मुळात खोटा इआयए हेच खरं तर बेकायदेशीर मायनिंगची सुरूवात आहे. हा अहवाल तयार होताना गावकर्‍यांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही, असाही त्यांचा आरोप आहे.

कोकणातल्या मायनिंग आणि औष्णिक वीज प्रकल्पांसाठी तयार करण्यात आलेले पर्यावरण अहवाल सदोष आहेत असं केंद्राने नेमलेल्या गाडगीळ समितीनेही नमूद केलंय. पण तरीही अशा प्रकल्पांना पर्यावरण मंत्रालय ना हरकत प्रमाणपत्र का देतं हा सवाल झोळंबेच्या गावकर्‍यानी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2012 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close