S M L

न्यूयॉर्क कॅफेमध्ये भरलाय बेरोजगारांचा मेळावा

23 नोव्हेंबर रिचर्ड रॉथ, न्यूयॉर्क जागतिक आथिर्क मंदीमुळे देशविदेशातल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कामगार कपात सुरू आहे. नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर ही मंडळी करतात तरी काय, असा प्रश्न कोणालाही पडणं साहाजिक आहे. न्यूयॉर्कमधील एका कॅफेमध्ये सध्या असंच दृश्य पहायला मिळतंय. मंदीमुळे कंपन्यांनी कामावरुन काढून टाकलेले अनेकजण याठिकाणी रोज गर्दी करताना दिसत आहेत. वॉलस्ट्रीट पिंक पार्टी म्हणजे कामावरुन काढलेल्यांचा अड्डाच. वॉलस्ट्रीटवरील कंपन्यांनी काढलेल्यांचा मेळा आहे. जे नोकरी शोधतायत आणि इथे नोकरी देणारेही लोक आहेत. रिक्रुटर्स आणि नोकरीसाठी इच्छुक तरुणांची गर्दी आहे. सध्या माझ्या राशी भविष्यात काय लिहलंय, यापेक्षा माझा रेझ्युम कसा आहे, हाच प्रश्न या तरुणांना पडतोय. नोकरी गेल्यानं अगदी निराश होऊनही या बारमध्ये येणारे काहीजण आहेत. ' मला या वर्षाअखेरपर्यंत नोकरी नाही मिळाली तर मी घर-दार विकून इथून बाहेर जाणार आहे. मी खरंच या विचारापर्यंत आलोय ' असं माईक नाजरियान सांगत होता. नोकरी गेलेले आपण एकटेच नाही, ही भावनाच या न्यूयॉर्क बारमध्ये येणार्‍यांना नवी जिद्द देतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 01:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close