S M L

कुलगुरु राजन वेळूकरांना हटवण्याची शिवसेनेची मागणी

02 एप्रिलमुंबई विद्यापीठातला पेपर फुटीचा आता राजकीय वादात सापडला आहे. शिवसेनेने कुलगुरू वेळूकरांना हटवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे विद्यापीठानं फुटलेला पेपर पुन्हा घेण्याची घोषणा केली असली.. तरी विद्यार्थी मात्र कोर्टात जाण्याच्या पवित्र्यात आहेत. पेपरफुटी प्रकरणामुळे मुंबई विद्यापीठाची पुरती नाचक्की झाली आहे. टीवायबीकॉमचा ह्युमन रिसोर्स या विषयाचा पेपर फुटल्याने विद्यापीठातल्या गोंधळाचा पर्दाफाश झाला. भिवंडीतल्या बीएनएन कॉलेजात दुसर्‍या दिवशीचा पेपर आधीच वाटला गेल्याने या वादाला सुरूवात झाली. पण पेपर फुटला, हे मान्य करायला विद्यापीठ तयारच नव्हतं. अखेरीस मीडियाच्या दबावानंतर विद्यापीठाने 3 सदस्यांची समिती नेमली. या समितीने बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एस.भांगरे, आर.एन.देशपांडे आणि प्राध्यापक जाधव यांना निलंबित केलं. सहा आठवड्यात ही समिती अहवाल देणार आहे.दरम्यान या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलंय. शिवसेनेनं राजन वेळूकरांना हटवण्याची मागणी केलीये. यापूर्वीसुद्धा वेळूकरांची नियुक्तीबाबत राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. विद्यापीठाने पुन्हा पेपर घेण्याची घोषणा केली. तर विद्यार्थ्यांनी पुन्हा पेपर द्यायला नकार देत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा हॉलपासून सुरु झालेला हा वाद आता राजभवनात मिटणार की कोर्टात हे लवकरच स्पष्ट होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 09:47 AM IST

कुलगुरु राजन वेळूकरांना हटवण्याची शिवसेनेची मागणी

02 एप्रिल

मुंबई विद्यापीठातला पेपर फुटीचा आता राजकीय वादात सापडला आहे. शिवसेनेने कुलगुरू वेळूकरांना हटवण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे विद्यापीठानं फुटलेला पेपर पुन्हा घेण्याची घोषणा केली असली.. तरी विद्यार्थी मात्र कोर्टात जाण्याच्या पवित्र्यात आहेत. पेपरफुटी प्रकरणामुळे मुंबई विद्यापीठाची पुरती नाचक्की झाली आहे. टीवायबीकॉमचा ह्युमन रिसोर्स या विषयाचा पेपर फुटल्याने विद्यापीठातल्या गोंधळाचा पर्दाफाश झाला. भिवंडीतल्या बीएनएन कॉलेजात दुसर्‍या दिवशीचा पेपर आधीच वाटला गेल्याने या वादाला सुरूवात झाली. पण पेपर फुटला, हे मान्य करायला विद्यापीठ तयारच नव्हतं. अखेरीस मीडियाच्या दबावानंतर विद्यापीठाने 3 सदस्यांची समिती नेमली. या समितीने बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एस.भांगरे, आर.एन.देशपांडे आणि प्राध्यापक जाधव यांना निलंबित केलं. सहा आठवड्यात ही समिती अहवाल देणार आहे.दरम्यान या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलंय. शिवसेनेनं राजन वेळूकरांना हटवण्याची मागणी केलीये. यापूर्वीसुद्धा वेळूकरांची नियुक्तीबाबत राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. विद्यापीठाने पुन्हा पेपर घेण्याची घोषणा केली. तर विद्यार्थ्यांनी पुन्हा पेपर द्यायला नकार देत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा हॉलपासून सुरु झालेला हा वाद आता राजभवनात मिटणार की कोर्टात हे लवकरच स्पष्ट होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 09:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close