S M L

म्यानमार लोकशाहीच्या वाटेवर ; स्यु की विजयी

02 एप्रिलम्यानमारमध्ये तब्बल दोन दशकानंतर संसदीय निवडणूक झालीय. या निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याचं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे पन्नास वर्षांपासून लष्करी राजवटीखाली असलेल्या म्यानमारची लोकशाहीकडे वाटचाल सुरु झाली.म्यानमार... म्हणजेच आधीचा ब्रम्हदेश.. नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार असलेलं आपलं शेजारी राष्ट्र. जुलमी लष्करी राजवटीमुळे जगाशी जवळपास संपर्कहीन झालेलं. आणि या निर्दय सत्तेला सुरुंग लावला. आँग सान स्यू की या महिलेने. पाश्चिमात्य देशांनी दबाव आणल्यामुळे तिथं वीस वर्षांनी संसदीय निवडणुका झाल्या. आणि त्यात स्यू कींचा विजय झाला असा दावा त्यांच्या नॅश्नल लीग फॉर डेमोक्र सी या पक्षानं केला. ही नव्या म्यानमारची सुरुवात आहे, असं स्यू कींनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितलं आहे. यापूर्वी सुद्धा 1990 साली स्यू कींचा विजय झाला होता. पण त्यानंतर लष्करी राजवटीनं त्यांना नजरकैदेत डांबलं होतं. स्यू कींचा प्रवास - स्यू की यांचा जन्म 19 जून 1945 रोजी म्यानमारची राजधानी यांगूनमध्ये झाला. - स्यू कींचे वडील आंग सान हे म्यानमारचे राष्ट्रपिता- स्यू कींचं शिक्षण नवी दिल्लीतच झालं- त्या दिल्लीत असतानाच.. 1962 मध्ये लष्कराने बंड करत म्यानमारमध्ये सत्ता काबीज केली- पुढे स्यू की यांनी हॉवर्डमधून तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्रत पदवी मिळवलीआजारी आईला भेटायला स्य ूकी मायदेशी परतल्या.. आणि लष्कराच्या अनागोंदी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरल्या. पण लष्कराने बंदुकीच्या जोरावर हे आंदोलन चिरडलं. नंतर त्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या विरोधी पक्षाशी जोडल्या गेल्या. वाढत्या लोकप्रियतेमुळे पुढची 15 वर्षं त्यांना नजरकैदेतच ठेवलं गेलं. 2010 साली स्यू की यांचीही सुटका झाली. आणि आंतराष्ट्रीय बंधंनाच्या दबावामुळे. त्यांना संसदीय निवडणूक लढण्याची मुभाही मिळाली. या निवडणुकीतला स्यू कींचा विजय.. हा लोकशाहीची स्वप्न बघणार्‍या म्यानमारसाठी हा मैलाचा दगड ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 05:44 PM IST

म्यानमार लोकशाहीच्या वाटेवर ; स्यु की विजयी

02 एप्रिल

म्यानमारमध्ये तब्बल दोन दशकानंतर संसदीय निवडणूक झालीय. या निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सॅन स्यू की मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याचं त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे पन्नास वर्षांपासून लष्करी राजवटीखाली असलेल्या म्यानमारची लोकशाहीकडे वाटचाल सुरु झाली.

म्यानमार... म्हणजेच आधीचा ब्रम्हदेश.. नैसर्गिक साधन संपत्तीचे भांडार असलेलं आपलं शेजारी राष्ट्र. जुलमी लष्करी राजवटीमुळे जगाशी जवळपास संपर्कहीन झालेलं. आणि या निर्दय सत्तेला सुरुंग लावला. आँग सान स्यू की या महिलेने. पाश्चिमात्य देशांनी दबाव आणल्यामुळे तिथं वीस वर्षांनी संसदीय निवडणुका झाल्या. आणि त्यात स्यू कींचा विजय झाला असा दावा त्यांच्या नॅश्नल लीग फॉर डेमोक्र सी या पक्षानं केला. ही नव्या म्यानमारची सुरुवात आहे, असं स्यू कींनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना सांगितलं आहे. यापूर्वी सुद्धा 1990 साली स्यू कींचा विजय झाला होता. पण त्यानंतर लष्करी राजवटीनं त्यांना नजरकैदेत डांबलं होतं. स्यू कींचा प्रवास

- स्यू की यांचा जन्म 19 जून 1945 रोजी म्यानमारची राजधानी यांगूनमध्ये झाला. - स्यू कींचे वडील आंग सान हे म्यानमारचे राष्ट्रपिता- स्यू कींचं शिक्षण नवी दिल्लीतच झालं- त्या दिल्लीत असतानाच.. 1962 मध्ये लष्कराने बंड करत म्यानमारमध्ये सत्ता काबीज केली- पुढे स्यू की यांनी हॉवर्डमधून तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्रत पदवी मिळवली

आजारी आईला भेटायला स्य ूकी मायदेशी परतल्या.. आणि लष्कराच्या अनागोंदी कारभाराविरोधात रस्त्यावर उतरल्या. पण लष्कराने बंदुकीच्या जोरावर हे आंदोलन चिरडलं. नंतर त्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या विरोधी पक्षाशी जोडल्या गेल्या. वाढत्या लोकप्रियतेमुळे पुढची 15 वर्षं त्यांना नजरकैदेतच ठेवलं गेलं. 2010 साली स्यू की यांचीही सुटका झाली. आणि आंतराष्ट्रीय बंधंनाच्या दबावामुळे. त्यांना संसदीय निवडणूक लढण्याची मुभाही मिळाली. या निवडणुकीतला स्यू कींचा विजय.. हा लोकशाहीची स्वप्न बघणार्‍या म्यानमारसाठी हा मैलाचा दगड ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close