S M L

लक्झरी वस्तूंवर मंदीचा परिणाम नाही

22 नोव्हेंबर मुंबईजगभर मंदीची लाट सुरू आहे. देशातही त्याची झळ पोचत आहे. पण या सगळ्याचा लक्झरी वस्तूंना अजूनही फटका बसलेला नाही. मोठे लक्झरी ब्रॅण्डस मंदीचा विचार न करता कामकाज वाढवण्याचे प्लान करत आहेत. भारतात सुमारे 15 कोटींचं लक्झरी मार्केट आहे. पण यावर आर्थिक मंदीचं सावट आलेलं नाही. लक्झरी अ‍ॅक्सेसरी ब्रॅण्ड - बालीने मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 10 ते 15 टक्क्यांचा जास्त व्यवसाय केला आहे. मेन्स वेअर ब्रॅण्ड ब्रिओनीने यावर्षी भारतात 30 ते 35 टक्के जास्त विक्री केली आहे. ब्रॅण्ड भारतात आणणारी बडा साहब डिझाईन कंपनी यामुळेच आता अनेक नवे ब्रॅण्ड भारतात आणणार आहे. लक्झरी ब्रॅण्डसची विक्री वाढल्याने आता हे ब्रॅण्ड नवी कलेक्शन्स आणणार आहेत. या वस्तू घेणा-यांकडे पैशांची कमी अजिबात नाही आणि म्हणूनच मागणीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. तुलनेने लक्झरी ब्रॅण्डसचं मार्केट अजून नवं आहे. त्यामुळे या मार्केटमधली ही तेजी अजून काही काळ कायम राहील.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 01:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close