S M L

कुलगुरुंनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

02 एप्रिलटी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' विषयाच्या पेपरमधील 4 प्रश्नापैकी 3 प्रश्न फुटले असल्याचं कुलगुरुंनी मान्य केलं पण राजकारण आणि शिक्षण हे वेगवेगळे ठेवणे गरजेचं आहे केवळ शिक्षणासाठी राजकारण करु नये असा सल्ला देत कुलगुरु राजन वेळुकर यांनी विद्यार्थी आणि पालकांना होणारा त्रासाबद्दल माफी मागितली. वेळुकर यांनी पहिल्यांदाच या प्रकरणी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून झालेल्या प्रकारबद्दल खुलासा केला. पेपर फुटीप्रकरणात बीएनएन महाविद्यालयाची चुकी आहे त्यांनी पेपर फुटला याची माहिती दिली नाही. जर त्यांनी वेळेवर ही माहिती दिली असती तर आजही वेळ आली नसती. पण पुन्हा पेपर घेणे हा विद्यापीठाचा नियम आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनीही पेपर द्यावा असं आवाहन कुलगुरु राजन वेळुकर यांनी केलं.भिवंडी येथील बीएनएन महाविद्यालयात टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' (मार्केटिंग ऍन्ड ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट ) विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एका विद्यार्थ्यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एस.भांगरे,वरिष्ठ पर्यवेक्षक आर.एन.देशपांडे,प्रा.जाधव यांना निलंबित करण्यात आले. तसेच 2015 पर्यंत या महाविद्यालयात परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात आली आहे. पण आज या प्रकरणावरुन शिवसेनेनं कुलगुरू राजन वेळुकर यांना हटवण्याची मागणी राज्यपालांकडे केली. मुंबई विद्यापीठात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे सरकारने कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई आणि आमदार रविंद्र वायकर यांनी केली. आज याच प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. झालेल्या प्रकारबद्दल कुलगुरुंनी जाहीर माफी मागितली. मला विद्यार्थ्यांना काय त्रास होतोय याची जाणीव आहे. पण यात चूक ही बीएनएन महाविद्यालयाची आहे त्यांनी वेळेवर यांचा खुलासा केला असता तर आज ही वेळ आली नसती. टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' पेपरमध्ये 4 प्रश्नांपैकी 3 प्रश्न फुटले. याची माहिती एसएमएस ने मिळाली होती. यानंतर पेपर सेट तपासला असता फूट निश्चित करण्यात आली. यानंतर ताबडतोब कारवाई करण्यात आली. पण पेपरसेटरने पेपर न फुटल्याचे सांगितले होते. अखेर सिनेटच्या बैठकीनंतर झालेल्या चौकशीत पेपर फुटल्याचं निष्पन्न झालं. आम्ही बारकोड आणि ओएमआर पध्दतींचा वापर करतो पण शेवटी झालेल्या प्रकार बद्दल दोषींवर कारवाई करण्यात येईल यासाठी 13 निर्णय घेण्यात आले आहे असंही वेळुकर यांनी स्पष्ट केलं. तसेच राजकारण आणि शिक्षण वेगळं ठेवावं, शिक्षणासाठी राजकारण आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप धोकादायकच आहे असं मतही वेळुकर यांनी व्यक्त केलं. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कर्मचार्‍यांची कमी आहे. हे पद दोन वर्षात भरुन काढण्यात येईल असंही वेळुकर यांनी स्पष्ट केलं. तसेच मी राज्यपालांची याबद्दल भेट घेतली संपूर्ण प्रकरणाची माहितीही त्यांना दिली लवकरच याबद्दलचा अहवाल राज्यपालांकडे सादर करणार आहे. तसेच फुटलेल्या पेपरनंतर पुन्हा परीक्षा घेण्याचा नियम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 11 एप्रिलला पेपर द्यावा असं आवाहनही कुलगुरुंनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 05:13 PM IST

कुलगुरुंनी मागितली विद्यार्थ्यांची माफी

02 एप्रिल

टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' विषयाच्या पेपरमधील 4 प्रश्नापैकी 3 प्रश्न फुटले असल्याचं कुलगुरुंनी मान्य केलं पण राजकारण आणि शिक्षण हे वेगवेगळे ठेवणे गरजेचं आहे केवळ शिक्षणासाठी राजकारण करु नये असा सल्ला देत कुलगुरु राजन वेळुकर यांनी विद्यार्थी आणि पालकांना होणारा त्रासाबद्दल माफी मागितली. वेळुकर यांनी पहिल्यांदाच या प्रकरणी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून झालेल्या प्रकारबद्दल खुलासा केला. पेपर फुटीप्रकरणात बीएनएन महाविद्यालयाची चुकी आहे त्यांनी पेपर फुटला याची माहिती दिली नाही. जर त्यांनी वेळेवर ही माहिती दिली असती तर आजही वेळ आली नसती. पण पुन्हा पेपर घेणे हा विद्यापीठाचा नियम आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनीही पेपर द्यावा असं आवाहन कुलगुरु राजन वेळुकर यांनी केलं.भिवंडी येथील बीएनएन महाविद्यालयात टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' (मार्केटिंग ऍन्ड ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट ) विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एका विद्यार्थ्यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. यामुळे बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी.एस.भांगरे,वरिष्ठ पर्यवेक्षक आर.एन.देशपांडे,प्रा.जाधव यांना निलंबित करण्यात आले. तसेच 2015 पर्यंत या महाविद्यालयात परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात आली आहे. पण आज या प्रकरणावरुन शिवसेनेनं कुलगुरू राजन वेळुकर यांना हटवण्याची मागणी राज्यपालांकडे केली. मुंबई विद्यापीठात अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे सरकारने कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई आणि आमदार रविंद्र वायकर यांनी केली.

आज याच प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु राजन वेळुकर यांनी आयबीएन लोकमतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. झालेल्या प्रकारबद्दल कुलगुरुंनी जाहीर माफी मागितली. मला विद्यार्थ्यांना काय त्रास होतोय याची जाणीव आहे. पण यात चूक ही बीएनएन महाविद्यालयाची आहे त्यांनी वेळेवर यांचा खुलासा केला असता तर आज ही वेळ आली नसती. टी.वाय.बी.कॉम.चा 'एमएचआरएम' पेपरमध्ये 4 प्रश्नांपैकी 3 प्रश्न फुटले. याची माहिती एसएमएस ने मिळाली होती. यानंतर पेपर सेट तपासला असता फूट निश्चित करण्यात आली. यानंतर ताबडतोब कारवाई करण्यात आली. पण पेपरसेटरने पेपर न फुटल्याचे सांगितले होते. अखेर सिनेटच्या बैठकीनंतर झालेल्या चौकशीत पेपर फुटल्याचं निष्पन्न झालं.

आम्ही बारकोड आणि ओएमआर पध्दतींचा वापर करतो पण शेवटी झालेल्या प्रकार बद्दल दोषींवर कारवाई करण्यात येईल यासाठी 13 निर्णय घेण्यात आले आहे असंही वेळुकर यांनी स्पष्ट केलं. तसेच राजकारण आणि शिक्षण वेगळं ठेवावं, शिक्षणासाठी राजकारण आणि राजकारण्यांचा हस्तक्षेप धोकादायकच आहे असं मतही वेळुकर यांनी व्यक्त केलं. विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कर्मचार्‍यांची कमी आहे. हे पद दोन वर्षात भरुन काढण्यात येईल असंही वेळुकर यांनी स्पष्ट केलं. तसेच मी राज्यपालांची याबद्दल भेट घेतली संपूर्ण प्रकरणाची माहितीही त्यांना दिली लवकरच याबद्दलचा अहवाल राज्यपालांकडे सादर करणार आहे. तसेच फुटलेल्या पेपरनंतर पुन्हा परीक्षा घेण्याचा नियम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 11 एप्रिलला पेपर द्यावा असं आवाहनही कुलगुरुंनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close