S M L

रामनवमी उत्सवात साईंच्या दानपेटीत 3 कोटी जमा

03 एप्रिलआपल्यामुळे संस्थानचे उत्पन्न वाढल्याचा शिर्डीच्या विश्वस्तांचा दावा साईभक्तांनी फोल ठरवला. यंदाच्या रामनवमी उत्सवादरम्यान साईबाबा मंदिरात विक्रमी दानाची नोंद झाली. गेल्या 3 दिवस चालणार्‍या या उत्सवात मंदिराच्या दानपेटीत 3 कोटी 9 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यात 1 कोटी 87 लाख रुपये रोख, तर सोनं-चांदी, परदेशी चलन असे 1 कोटी 22 लाख रुपयांचा समावेश आहे. म्हणजे दोन्ही मिळुन 3 कोटी 9 लाख दान जमा झालंय. गेल्या वर्षी एकूण 2 कोटी 84 लाख दान संकलित झाले होते. अलीकडेच विश्वस्त समिती औरंगाबाद खंडपीठाने बरखास्त केले आणि नव्या समितीलाही स्थगिती दिली आहे. विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभारामुळे शिर्डी संस्थान वादाच्या भोवर्‍यात सापडले. त्यामुळे रामनवमीला साईभक्तची गर्दी कमी होईल अशी शक्यता होती पण भक्तांच्या श्रध्देत जरा सुध्दा कमी पडली नाही. रामनवमीला साईभक्तांनी अलोट गर्दी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2012 01:56 PM IST

रामनवमी उत्सवात साईंच्या दानपेटीत 3 कोटी जमा

03 एप्रिल

आपल्यामुळे संस्थानचे उत्पन्न वाढल्याचा शिर्डीच्या विश्वस्तांचा दावा साईभक्तांनी फोल ठरवला. यंदाच्या रामनवमी उत्सवादरम्यान साईबाबा मंदिरात विक्रमी दानाची नोंद झाली. गेल्या 3 दिवस चालणार्‍या या उत्सवात मंदिराच्या दानपेटीत 3 कोटी 9 लाख रुपये जमा झाले आहेत. त्यात 1 कोटी 87 लाख रुपये रोख, तर सोनं-चांदी, परदेशी चलन असे 1 कोटी 22 लाख रुपयांचा समावेश आहे. म्हणजे दोन्ही मिळुन 3 कोटी 9 लाख दान जमा झालंय. गेल्या वर्षी एकूण 2 कोटी 84 लाख दान संकलित झाले होते. अलीकडेच विश्वस्त समिती औरंगाबाद खंडपीठाने बरखास्त केले आणि नव्या समितीलाही स्थगिती दिली आहे. विश्वस्त मंडळाच्या मनमानी कारभारामुळे शिर्डी संस्थान वादाच्या भोवर्‍यात सापडले. त्यामुळे रामनवमीला साईभक्तची गर्दी कमी होईल अशी शक्यता होती पण भक्तांच्या श्रध्देत जरा सुध्दा कमी पडली नाही. रामनवमीला साईभक्तांनी अलोट गर्दी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2012 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close