S M L

मुलाच्या हट्टासाठी गर्भातच घोटला मुलीचा गळा

03 एप्रिलमुलगी नको म्हणून मुलीचा जीव घेण्याचे लाजिरवाणा प्रकार आंध्रप्रदेशमध्ये घडला. आंध्रमध्यल्या गुंटुरमध्ये नवर्‍याने आपल्या 6 महिन्याच्या गरोदर पत्नीच्या पोटावर लोखंडी रॉडनं मारहाण केली. यात तिचा गर्भपात झाला. तुम्हाला मुलगी होणार, असं एका भोंदू बाबाने या नवर्‍याला सांगितलं होतं. यामुळे त्यानं बायकोला गर्भपात करायला सांगितलं. बायकोनं नकार दिल्यानं त्यानं तिच्या पोटावर लोखंडी रॉडनं वार केले. या जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांचं सातवं अपत्य हे मुलगा असेल असं भोंदु बाबानं सांगितलं होतं. त्यामुळे यापूर्वीही दोन वेळा गर्भपात केल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. पण तिसर्‍यांदा गर्भपात करायला तिनं नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या या नराधमाने हा अमानुष प्रकार केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 3, 2012 05:13 PM IST

मुलाच्या हट्टासाठी गर्भातच घोटला मुलीचा गळा

03 एप्रिल

मुलगी नको म्हणून मुलीचा जीव घेण्याचे लाजिरवाणा प्रकार आंध्रप्रदेशमध्ये घडला. आंध्रमध्यल्या गुंटुरमध्ये नवर्‍याने आपल्या 6 महिन्याच्या गरोदर पत्नीच्या पोटावर लोखंडी रॉडनं मारहाण केली. यात तिचा गर्भपात झाला. तुम्हाला मुलगी होणार, असं एका भोंदू बाबाने या नवर्‍याला सांगितलं होतं. यामुळे त्यानं बायकोला गर्भपात करायला सांगितलं. बायकोनं नकार दिल्यानं त्यानं तिच्या पोटावर लोखंडी रॉडनं वार केले. या जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांचं सातवं अपत्य हे मुलगा असेल असं भोंदु बाबानं सांगितलं होतं. त्यामुळे यापूर्वीही दोन वेळा गर्भपात केल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. पण तिसर्‍यांदा गर्भपात करायला तिनं नकार दिला होता. त्यामुळे संतापलेल्या या नराधमाने हा अमानुष प्रकार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 3, 2012 05:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close