S M L

विलासरावांचे परतीचे दोर कापले !

आशिष जाधव, मुंबई05 एप्रिलआदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात नावं असतानाच सुप्रीम कोर्टाने विलासराव देशमुख यांच्यावर व्हिसलिंग वूड्स प्रकरणाचं सर्व खापर फोडलं. त्यामुळे पुन्हा राज्यात परत येण्याचं विलासरावांचं स्वप्न भंगलं अशी कुजबुज काँग्रेसमध्ये सुरु झाली आहे.सानंदा प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे ताशेरे आणि 10 लाखाचा दंड.. व्हिसलिंग वुड्सला जमीन दिली म्हणून पुन्हा सुप्रीम कोर्टाचे ताशेरे..मांजरा साखर कारखाना प्रकरणी कॅगचा ठपका.. आणि आदर्श घोटाळ्यातली टांगती तलवार.. या सर्व आरोपांच्या फेर्‍यात विलासराव पूर्णपणे अडकले आहेत. यामुळेच विलासराव हटाव मोहीम दिल्लीत जोर पकडतेय. व्हिसलिंग वूड्स प्रकरणी विलासरावांनी सुभाष घईंना कवडीमोल भावाने सरकारी जमीन दिली. त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणतं, "एखादी व्यक्ती आवडती आहे, म्हणून मुख्यमंत्री नियम मोडू अथवा वाकवू शकत नाहीत. या आवडत्या व्यक्तीला राज्य सरकारन कवडीमोल भावानं जमीन दिली. याप्रकरणात सरकारची जी नाचक्की झाली, त्याला विलासरावच जबाबदार आहेत, हे काँग्रेसश्रेष्ठींनाही पटलंय. त्यामुळे काँग्रेसचे नेते विलासरावांच्या विषयात फारसं बोलत नाहीत.एवढं कमी म्हणून की काय कॅगनंही विलासरावांना दणका दिला. त्यांच्या ट्रस्टने त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात जमीन लाटल्याचा ठपका कॅगने ठेवला. यावर विलासराव म्हणतात, "कोणत्याही फुटलेल्या अहवालावर मी प्रतिक्रिया देणार नाही. कॅगचा अहवाल आधी विधानसभेत मांडू द्या. मला खात्री आहे, त्यात माझ्याविरोधात काहीही नसेल. व्हिसलिंग वूड्सप्रकरणी माझ्याविरोधात जे ताशेरे ओढण्यात आलेत, त्याविरोधात मी सुप्रीम कोर्टात अपील करणार आहे."आदर्श असेल किंवा व्हिसलिंग वूड्सचं प्रकरण यात विलासरावांवर न्यायालयाचा फेरा वाढत चालला आहे. त्यामुळेच आता विलासरावांचे राज्यातले परतीचे दोर कापले गेलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2012 12:41 PM IST

विलासरावांचे परतीचे दोर कापले !

आशिष जाधव, मुंबई

05 एप्रिल

आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यात नावं असतानाच सुप्रीम कोर्टाने विलासराव देशमुख यांच्यावर व्हिसलिंग वूड्स प्रकरणाचं सर्व खापर फोडलं. त्यामुळे पुन्हा राज्यात परत येण्याचं विलासरावांचं स्वप्न भंगलं अशी कुजबुज काँग्रेसमध्ये सुरु झाली आहे.

सानंदा प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे ताशेरे आणि 10 लाखाचा दंड.. व्हिसलिंग वुड्सला जमीन दिली म्हणून पुन्हा सुप्रीम कोर्टाचे ताशेरे..मांजरा साखर कारखाना प्रकरणी कॅगचा ठपका.. आणि आदर्श घोटाळ्यातली टांगती तलवार.. या सर्व आरोपांच्या फेर्‍यात विलासराव पूर्णपणे अडकले आहेत. यामुळेच विलासराव हटाव मोहीम दिल्लीत जोर पकडतेय. व्हिसलिंग वूड्स प्रकरणी विलासरावांनी सुभाष घईंना कवडीमोल भावाने सरकारी जमीन दिली. त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणतं, "एखादी व्यक्ती आवडती आहे, म्हणून मुख्यमंत्री नियम मोडू अथवा वाकवू शकत नाहीत. या आवडत्या व्यक्तीला राज्य सरकारन कवडीमोल भावानं जमीन दिली.

याप्रकरणात सरकारची जी नाचक्की झाली, त्याला विलासरावच जबाबदार आहेत, हे काँग्रेसश्रेष्ठींनाही पटलंय. त्यामुळे काँग्रेसचे नेते विलासरावांच्या विषयात फारसं बोलत नाहीत.

एवढं कमी म्हणून की काय कॅगनंही विलासरावांना दणका दिला. त्यांच्या ट्रस्टने त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या काळात जमीन लाटल्याचा ठपका कॅगने ठेवला. यावर विलासराव म्हणतात, "कोणत्याही फुटलेल्या अहवालावर मी प्रतिक्रिया देणार नाही. कॅगचा अहवाल आधी विधानसभेत मांडू द्या. मला खात्री आहे, त्यात माझ्याविरोधात काहीही नसेल. व्हिसलिंग वूड्सप्रकरणी माझ्याविरोधात जे ताशेरे ओढण्यात आलेत, त्याविरोधात मी सुप्रीम कोर्टात अपील करणार आहे."

आदर्श असेल किंवा व्हिसलिंग वूड्सचं प्रकरण यात विलासरावांवर न्यायालयाचा फेरा वाढत चालला आहे. त्यामुळेच आता विलासरावांचे राज्यातले परतीचे दोर कापले गेलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2012 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close