S M L

'एमईटी'वर भुजबळांचे 'नो कॉमेंट्स'

07 एप्रिलसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट म्हणजेच एमईटी (MET)ची आज दिवसभर चौकशी झाली. काही वेळापूर्वीच पहिल्या दिवसाची पाहणी संपली. मात्र, छगन भुजबळांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. जे बोलायचं ते कोर्टात बोलू असं भुजबळ म्हणाले. 10 व्या मजल्यावर गेस्ट हाऊस आहे. 8 व्या माळ्यावर बांधकाम सुरु आहे. तिथे फर्निचरचं शोरुम नसल्याचा दावा एमईटीचे वकील सजल यादव यांनी केला आहे. आज छगन भुजबळांच्या एमईटी(MET)या शिक्षण संस्थेच्या चौकशीसाठी आज सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी पाहणी केली. मुंबईतल्या या नामवंत शिक्षण संस्थेत भुजबळांनी 179 कोटींचा गैरव्यवहार केलाय असा आरोप तक्रारदार आणि या संस्थेचे फाऊंडर सुनील कर्वेंनी केला. संस्थेच्या 2 मजल्यांवर बेकायदेशीर बांधकाम झाल्याचं आज स्पष्ट झालंय. मुंबई एजुकेशन ट्रस्ट.. मुंबईतली एक मोठी शैक्षणिक संस्था.. पण शनिवारी इथे पोलिसांचा गराडा होता. कारण संस्थेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी गैरव्यवहार केलाय का, हे तपासायला असिस्टंट चॅरिटी कमिश्नर मंगेश देशपांडे आले होते. ते येताच नाट्याला सुरुवात झाली. कारण तक्रारदार आणि संस्थेचे संस्थापक सुनील कर्वेंनाच.वादग्रस्त 8व्या आणि 10व्या मजल्यावर प्रवेश करायला मनाई करण्यात आली. छगन भुजबळांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या 8व्या आणि 10 व्या मजल्याचा खासगी कामासाठी वापर केल्याचा आरोप आहे. या जागेची चार तास पाहणी केल्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त बाहेर पडले. या कारवाईवर बोलायला छगन भुजबळांनी नकार दिला. पण एमईटीच्या वकिलांनी मात्र 2 महिन्यांनंतर पहिल्यांदा तोंड उघडलं.एमईटी प्रकरण न्यायालयात आहे. त्याबद्दल जे बोलायचे आहे, ते न्यायालयात बोलेन अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. आता 11 एप्रिलच्या दिवशी धर्मादाय आयुक्त या विषयावर सुनावणी करणार आहेत. राज्यात मंत्री असणार्‍या भुजबळांच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असेल. रातोरात फर्निचरच दुकान घरी पळवलं !एमईटी च्या आठव्या मजल्यावर छगन भुजबळ यांच्या सुनांची इडनीन फर्निचर ही कंपनी कशी चालवली जात होती.आणि तक्रारीनंतर रातोरात तिथलं सामान सांताक्रूझ इथल्या कॉन्व्हेंट ऍव्हेन्यू रोडवरच्या छगन भुजबळ यांच्या बहुमजली बंगल्यामध्ये कसं नेण्यात आलं. पुरावे नष्ट करण्याचं हे कारस्थान इथचं थांबलं नाही. असिस्टंट चॅरिटी कमिशनरने इथं येऊन चौकशी करण्याआधीच त्यांनी अख्ख्या मजल्यावर नवं बांधकाम सुरु केलंय.शनिवारी सकाळी असिस्टंट चॅरिटी कमिशनर एमईटीमध्ये चौकशी करण्यासाठी येणार आहेत. फोटोग्राफी आणि व्हिडिओ शुटिंग करुन त्याबद्दलचा अहवाल सादर करणार आहेत.चॅरिटी कमिशनरनी चौकशीचे आदेश चार एप्रिलला दिले आणि त्याच मध्यरात्री मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या शैक्षणिक इमारतीत हे बांधकाम सुरु झालं. गुरुवारचा अख्खा दिवस हे काम अखंडपणे सुरुच होतं. सिमेंटच्या गोण्या...डेब्रीचे ट्रक्स....रंगकाम करणारे रंगारी....ही सगळी दृष्य आम्ही मुष्कीलीनं मिळवली. कारण, शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या इमारतीभोवती आता गुंडांचा कडक पहाराही ठेवण्यात आला. इतकचं नाही तर ट्रस्टमधला गैरव्यवहार बाहेर काढल्याचा वचपा म्हणून छगन भुजबळ यांनी चक्क सुनील कर्वे यांनाच एमईटीमध्ये प्रवेशाला बंदी घातलेय.या सर्वात धक्कादायक म्हणजे पोलिसांनी घेतलेली बोटचेपी भूमिका. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने चक्क लेखी कबुली दिलीय की, तुमची तक्रार आम्ही नोंदवूनही घेतली नाही. भुजबळांनी पोलिसांमध्ये राष्ट्रवादीचं वजन वापरलं. पण चॅरिटी कमिशनरने आपला बडगा उगारला. भुजबळांचं गेस्ट हाऊस असलेल्या 'एमईटी'च्या दहाव्या मजल्याचा आणि फॅमिली बिझनेस सेंटर असलेल्या आठव्या मजल्याचा वापर फक्त शैक्षणिक कारणांसाठीच करावा, असे हंगामी आदेशच देण्यात आले आहे. एमईटीची उर्वरित लढाई आता रंगणारेय ती मुंबई हायकोर्टात.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 09:33 AM IST

'एमईटी'वर भुजबळांचे 'नो कॉमेंट्स'

07 एप्रिलसार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट म्हणजेच एमईटी (MET)ची आज दिवसभर चौकशी झाली. काही वेळापूर्वीच पहिल्या दिवसाची पाहणी संपली. मात्र, छगन भुजबळांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. जे बोलायचं ते कोर्टात बोलू असं भुजबळ म्हणाले. 10 व्या मजल्यावर गेस्ट हाऊस आहे. 8 व्या माळ्यावर बांधकाम सुरु आहे. तिथे फर्निचरचं शोरुम नसल्याचा दावा एमईटीचे वकील सजल यादव यांनी केला आहे.

आज छगन भुजबळांच्या एमईटी(MET)या शिक्षण संस्थेच्या चौकशीसाठी आज सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी पाहणी केली. मुंबईतल्या या नामवंत शिक्षण संस्थेत भुजबळांनी 179 कोटींचा गैरव्यवहार केलाय असा आरोप तक्रारदार आणि या संस्थेचे फाऊंडर सुनील कर्वेंनी केला. संस्थेच्या 2 मजल्यांवर बेकायदेशीर बांधकाम झाल्याचं आज स्पष्ट झालंय.

मुंबई एजुकेशन ट्रस्ट.. मुंबईतली एक मोठी शैक्षणिक संस्था.. पण शनिवारी इथे पोलिसांचा गराडा होता. कारण संस्थेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी गैरव्यवहार केलाय का, हे तपासायला असिस्टंट चॅरिटी कमिश्नर मंगेश देशपांडे आले होते. ते येताच नाट्याला सुरुवात झाली. कारण तक्रारदार आणि संस्थेचे संस्थापक सुनील कर्वेंनाच.वादग्रस्त 8व्या आणि 10व्या मजल्यावर प्रवेश करायला मनाई करण्यात आली.

छगन भुजबळांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संस्थेच्या 8व्या आणि 10 व्या मजल्याचा खासगी कामासाठी वापर केल्याचा आरोप आहे. या जागेची चार तास पाहणी केल्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त बाहेर पडले. या कारवाईवर बोलायला छगन भुजबळांनी नकार दिला. पण एमईटीच्या वकिलांनी मात्र 2 महिन्यांनंतर पहिल्यांदा तोंड उघडलं.

एमईटी प्रकरण न्यायालयात आहे. त्याबद्दल जे बोलायचे आहे, ते न्यायालयात बोलेन अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. आता 11 एप्रिलच्या दिवशी धर्मादाय आयुक्त या विषयावर सुनावणी करणार आहेत. राज्यात मंत्री असणार्‍या भुजबळांच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असेल.

रातोरात फर्निचरच दुकान घरी पळवलं !

एमईटी च्या आठव्या मजल्यावर छगन भुजबळ यांच्या सुनांची इडनीन फर्निचर ही कंपनी कशी चालवली जात होती.आणि तक्रारीनंतर रातोरात तिथलं सामान सांताक्रूझ इथल्या कॉन्व्हेंट ऍव्हेन्यू रोडवरच्या छगन भुजबळ यांच्या बहुमजली बंगल्यामध्ये कसं नेण्यात आलं. पुरावे नष्ट करण्याचं हे कारस्थान इथचं थांबलं नाही. असिस्टंट चॅरिटी कमिशनरने इथं येऊन चौकशी करण्याआधीच त्यांनी अख्ख्या मजल्यावर नवं बांधकाम सुरु केलंय.

शनिवारी सकाळी असिस्टंट चॅरिटी कमिशनर एमईटीमध्ये चौकशी करण्यासाठी येणार आहेत. फोटोग्राफी आणि व्हिडिओ शुटिंग करुन त्याबद्दलचा अहवाल सादर करणार आहेत.चॅरिटी कमिशनरनी चौकशीचे आदेश चार एप्रिलला दिले आणि त्याच मध्यरात्री मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या शैक्षणिक इमारतीत हे बांधकाम सुरु झालं.

गुरुवारचा अख्खा दिवस हे काम अखंडपणे सुरुच होतं. सिमेंटच्या गोण्या...डेब्रीचे ट्रक्स....रंगकाम करणारे रंगारी....ही सगळी दृष्य आम्ही मुष्कीलीनं मिळवली. कारण, शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या या इमारतीभोवती आता गुंडांचा कडक पहाराही ठेवण्यात आला. इतकचं नाही तर ट्रस्टमधला गैरव्यवहार बाहेर काढल्याचा वचपा म्हणून छगन भुजबळ यांनी चक्क सुनील कर्वे यांनाच एमईटीमध्ये प्रवेशाला बंदी घातलेय.

या सर्वात धक्कादायक म्हणजे पोलिसांनी घेतलेली बोटचेपी भूमिका. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने चक्क लेखी कबुली दिलीय की, तुमची तक्रार आम्ही नोंदवूनही घेतली नाही.

भुजबळांनी पोलिसांमध्ये राष्ट्रवादीचं वजन वापरलं. पण चॅरिटी कमिशनरने आपला बडगा उगारला. भुजबळांचं गेस्ट हाऊस असलेल्या 'एमईटी'च्या दहाव्या मजल्याचा आणि फॅमिली बिझनेस सेंटर असलेल्या आठव्या मजल्याचा वापर फक्त शैक्षणिक कारणांसाठीच करावा, असे हंगामी आदेशच देण्यात आले आहे. एमईटीची उर्वरित लढाई आता रंगणारेय ती मुंबई हायकोर्टात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close