S M L

शरद पवारांच्या मतदारसंघात पाण्यासाठी वणवण

अद्वैत मेहता, पुणे 08 एप्रिलसातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या कायम दुष्काळी तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच विहिरी आटल्यात, बोअरवेल बंद पडले आहे. माणसांना आणि जनावरांना प्यायचं पाणी मिळवण्याकरता वणवण करावी लागतेय. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या या दुष्काळी तालुक्यातील जनता या भागाला कधी पाणी मिळणार असा प्रश्न विचारतेय.माण आणि खटाव हा कायम दुष्काळी भाग...हा भाग केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नव्या माढा लोकसभा मतदारसंघात येतो. 1 एप्रिलला मुख्ममंत्र्यांनी या भागाला भेट दिली. शेतमजुरांसोबत सहभोजन केलं. पण त्यांच्याकडे आशेनं पाहणार्‍या इथल्या नागरिकांना मुख्ममंत्र्यांनीही एप्रिल फूल केलं. शरद पवारांनीही दुष्काळी कामांची पाहणी केली. पण दुष्काळग्रस्तांच्या पदरात पडली ती फक्त आश्वासनंच. जिल्ह्याचे पालकमंत्रीही आश्वासनं देताना थकत नाहीत.मंत्री येऊन दौरे करून गेले.. आश्वासनही देऊन गेले पण प्रत्यक्षात पाणी कधी येणार याचं उत्तर कुणाकडेच नाही. आपल्या हयातीत पाणी येईल याची हमी जुन्या पिढीला तर सोडा, पण तरूण पिढीलाही नाही.पाचवीला पूजलेला दुष्काळ... तरीही कष्टाने तगून राहायची माणदेशी वृत्ती जशी कौतुकास्पद...तसाच वर्षानुवर्षे तीच ती आश्वासनं देऊन सत्ता भोगणार्‍या सत्ताधार्‍यांचा निगरगट्टपणाही दाद देण्याजोगाच म्हणावा लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2012 10:37 AM IST

शरद पवारांच्या मतदारसंघात पाण्यासाठी वणवण

अद्वैत मेहता, पुणे

08 एप्रिल

सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या कायम दुष्काळी तालुक्यात एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासूनच विहिरी आटल्यात, बोअरवेल बंद पडले आहे. माणसांना आणि जनावरांना प्यायचं पाणी मिळवण्याकरता वणवण करावी लागतेय. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या या दुष्काळी तालुक्यातील जनता या भागाला कधी पाणी मिळणार असा प्रश्न विचारतेय.

माण आणि खटाव हा कायम दुष्काळी भाग...हा भाग केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या नव्या माढा लोकसभा मतदारसंघात येतो. 1 एप्रिलला मुख्ममंत्र्यांनी या भागाला भेट दिली. शेतमजुरांसोबत सहभोजन केलं. पण त्यांच्याकडे आशेनं पाहणार्‍या इथल्या नागरिकांना मुख्ममंत्र्यांनीही एप्रिल फूल केलं. शरद पवारांनीही दुष्काळी कामांची पाहणी केली. पण दुष्काळग्रस्तांच्या पदरात पडली ती फक्त आश्वासनंच. जिल्ह्याचे पालकमंत्रीही आश्वासनं देताना थकत नाहीत.

मंत्री येऊन दौरे करून गेले.. आश्वासनही देऊन गेले पण प्रत्यक्षात पाणी कधी येणार याचं उत्तर कुणाकडेच नाही. आपल्या हयातीत पाणी येईल याची हमी जुन्या पिढीला तर सोडा, पण तरूण पिढीलाही नाही.

पाचवीला पूजलेला दुष्काळ... तरीही कष्टाने तगून राहायची माणदेशी वृत्ती जशी कौतुकास्पद...तसाच वर्षानुवर्षे तीच ती आश्वासनं देऊन सत्ता भोगणार्‍या सत्ताधार्‍यांचा निगरगट्टपणाही दाद देण्याजोगाच म्हणावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2012 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close