S M L

युवराज परतला मायदेशी

09 एप्रिलकॅन्सरवर मात करुन अखेर भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंग भारतात परतला आहे. आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर युवराजचं आगमन झालं. फुफ्फसात कॅन्सरची गाठ झाल्याने युवराज अमेरिकेत उपचार घेत होता. मागिल महिन्यात डॉक्टरांनी उपचार पूर्ण झाला म्हणून युवराजची हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर युवी लंडनमध्ये थांबला होता. आज अखेर युवराज भारतात परतला आहे. दिल्ली एअरपोर्टवर युवराजला घेण्यासाठी त्याची आई शबनम पोहचल्या होत्या. युवराज त्याच्या आई सोबत गुडगाव येथील आपल्या घरी रवाना झाला. अमेरिकेतील बॉस्टन इंस्टिटुयट ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये दोन महिने उपचार घेतल्यानंतर युवराज आज भारतात परतला. युवी 26 जानेवारीला उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. बॉस्टनमध्ये युवीवर तीन टप्प्यात केमोथेरपीची प्रक्रिया झाली. अखेर युवीने कडवी झुंज देत एका विजेत्याच्या रुपाने समोर आला. प्रचंड जिद्द, करोड चाहत्यांच्या प्रेमामुळे युवीने कॅन्सरवर मात केली. बॉस्टनमधून सुट्टी मिळल्यानंतर युवी काही दिवस लंडन येथे थांबला होता. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने युवीची भेट घेतली होती. काल युवीने टिवटरवर, अखेर आता ती वेळ आली आहे. मी मायदेशी परतत आहे मला आता राहवलं जात नाही. मला घरच्यांना, मित्रांना भेटायचे आहे मी त्यांना भेटण्यासाठी उत्सुक्त आहे. माझा भारत महान ! अशी प्रतिक्रिया युवीने दिली. पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार केमोथेरपीनंतर माणूस अशक्त होतो. त्याला थकवा येतो. त्यामुळे युवी मैदानावर तर उतरु शकतो. त्याने थोडा-थोडा सराव करावा लागेल. युवीला फिट होण्यासाठी अजून काही महिने लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2012 09:10 AM IST

युवराज परतला मायदेशी

09 एप्रिल

कॅन्सरवर मात करुन अखेर भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंग भारतात परतला आहे. आज सकाळी दिल्ली एअरपोर्टवर युवराजचं आगमन झालं. फुफ्फसात कॅन्सरची गाठ झाल्याने युवराज अमेरिकेत उपचार घेत होता. मागिल महिन्यात डॉक्टरांनी उपचार पूर्ण झाला म्हणून युवराजची हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर युवी लंडनमध्ये थांबला होता. आज अखेर युवराज भारतात परतला आहे. दिल्ली एअरपोर्टवर युवराजला घेण्यासाठी त्याची आई शबनम पोहचल्या होत्या. युवराज त्याच्या आई सोबत गुडगाव येथील आपल्या घरी रवाना झाला.

अमेरिकेतील बॉस्टन इंस्टिटुयट ऑफ कॅन्सर रिसर्चमध्ये दोन महिने उपचार घेतल्यानंतर युवराज आज भारतात परतला. युवी 26 जानेवारीला उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. बॉस्टनमध्ये युवीवर तीन टप्प्यात केमोथेरपीची प्रक्रिया झाली. अखेर युवीने कडवी झुंज देत एका विजेत्याच्या रुपाने समोर आला. प्रचंड जिद्द, करोड चाहत्यांच्या प्रेमामुळे युवीने कॅन्सरवर मात केली. बॉस्टनमधून सुट्टी मिळल्यानंतर युवी काही दिवस लंडन येथे थांबला होता. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने युवीची भेट घेतली होती. काल युवीने टिवटरवर, अखेर आता ती वेळ आली आहे. मी मायदेशी परतत आहे मला आता राहवलं जात नाही. मला घरच्यांना, मित्रांना भेटायचे आहे मी त्यांना भेटण्यासाठी उत्सुक्त आहे. माझा भारत महान ! अशी प्रतिक्रिया युवीने दिली. पण तज्ञांच्या म्हणण्यानुसार केमोथेरपीनंतर माणूस अशक्त होतो. त्याला थकवा येतो. त्यामुळे युवी मैदानावर तर उतरु शकतो. त्याने थोडा-थोडा सराव करावा लागेल. युवीला फिट होण्यासाठी अजून काही महिने लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2012 09:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close