S M L

संचेतींमुळे नितीन गडकरी अडचणीत

भूपेंद्र चौबे, नवी दिल्ली09 एप्रिलउद्योगपती अजय संचेतींमुळे नितीन गडकरी अडचणीत आले आहे. उद्योगपती अजय संचेती यांच्यावर कॅगने कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. संचेती यांना बेकायदेशीरपणे कोळसा खाण दिल्यामुळे छत्तीसगड सरकारचे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचं कॅगनं म्हटलं आहे. कॅगचा हा अहवाल नुकताच छत्तीसगडच्या विधानसभेत सादर करण्यात आला. अजय संचेती हे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना भाजपकडून नुकतीच राज्यसभेची खासदारकी मिळाली. नितीन गडकरींचे घनिष्ठ मित्र... अजय कुमार संचेती.. पण आता या खासदार मित्रामुळेच नितीन गडकरींवर नामुष्की ओढावली आहे. छत्तीसगढ विधानसभेत गेल्याच आठवड्यात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. यात संचेतींवर ताशेरे ओढण्यात आले. गडकरींच्याच आशीर्वादामुळे संचेती यांना यावेळी राज्यसभेची सीट मिळाली. पण त्याच संचेतींवर कॅगने भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला. संचेती कॅगच्या कचाट्यात - 2007 साली संचेतीच्या एसएमएस (SMS) इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बेकायदेशीरपणे कोळसा खाणीचं वाटप करण्यात आलं- त्यामुळे छत्तीसगढ सरकारला एक हजार कोटींचं नुकसान झाल्याचं अहवालात म्हटलंय- कोळसा खाण वाटपाचा दर रु 552 प्रति मेट्रिक टन असताना संचेती यांच्या कंपनीला रु 130 च्या अल्प दरानं देण्यात आलंज्यावेळी हा व्यवहार झाला त्यावेळी गडकरी भाजपचे अध्यक्ष नव्हते. पण आता ते अध्यक्ष आहेत. शिवाय त्यांच्या पक्षाने कॅगच्याच अहवालावरुन यूपीए सरकारवर टीकेची झोड उठवलीय. पण आता भाजपला कॅगवर प्रश्नचिन्हं उपस्थित करावं लागतंय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह म्हणतात, हे फक्त अंदाज आहेत. या रिपोर्टमध्ये ठोस असं काहीच नाही. तर काँग्रेसचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंद कुमार पटेल यांनी यामुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला असा टोला लगावला.यापूर्वी अंशुमन मिश्रा या उद्योगपतीला झारखंडमधून राज्यसभेचं तिकीट देण्याच्या मुद्द्यावरून बराच वाद झाला. ते ही गडकरींच्या खास मित्रांमधले समजले जातात. वाद झाल्यामुळे त्यांचं तिकीट गडकरींनी कापलं. आता गडकरी संचेतींवर कारवाई करतील का हाच खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 9, 2012 05:03 PM IST

संचेतींमुळे नितीन गडकरी अडचणीत

भूपेंद्र चौबे, नवी दिल्ली

09 एप्रिल

उद्योगपती अजय संचेतींमुळे नितीन गडकरी अडचणीत आले आहे. उद्योगपती अजय संचेती यांच्यावर कॅगने कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला आहे. संचेती यांना बेकायदेशीरपणे कोळसा खाण दिल्यामुळे छत्तीसगड सरकारचे एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचं कॅगनं म्हटलं आहे. कॅगचा हा अहवाल नुकताच छत्तीसगडच्या विधानसभेत सादर करण्यात आला. अजय संचेती हे भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना भाजपकडून नुकतीच राज्यसभेची खासदारकी मिळाली.

नितीन गडकरींचे घनिष्ठ मित्र... अजय कुमार संचेती.. पण आता या खासदार मित्रामुळेच नितीन गडकरींवर नामुष्की ओढावली आहे. छत्तीसगढ विधानसभेत गेल्याच आठवड्यात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. यात संचेतींवर ताशेरे ओढण्यात आले. गडकरींच्याच आशीर्वादामुळे संचेती यांना यावेळी राज्यसभेची सीट मिळाली. पण त्याच संचेतींवर कॅगने भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला.

संचेती कॅगच्या कचाट्यात

- 2007 साली संचेतीच्या एसएमएस (SMS) इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला बेकायदेशीरपणे कोळसा खाणीचं वाटप करण्यात आलं- त्यामुळे छत्तीसगढ सरकारला एक हजार कोटींचं नुकसान झाल्याचं अहवालात म्हटलंय- कोळसा खाण वाटपाचा दर रु 552 प्रति मेट्रिक टन असताना संचेती यांच्या कंपनीला रु 130 च्या अल्प दरानं देण्यात आलं

ज्यावेळी हा व्यवहार झाला त्यावेळी गडकरी भाजपचे अध्यक्ष नव्हते. पण आता ते अध्यक्ष आहेत. शिवाय त्यांच्या पक्षाने कॅगच्याच अहवालावरुन यूपीए सरकारवर टीकेची झोड उठवलीय. पण आता भाजपला कॅगवर प्रश्नचिन्हं उपस्थित करावं लागतंय.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह म्हणतात, हे फक्त अंदाज आहेत. या रिपोर्टमध्ये ठोस असं काहीच नाही. तर काँग्रेसचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नंद कुमार पटेल यांनी यामुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला असा टोला लगावला.

यापूर्वी अंशुमन मिश्रा या उद्योगपतीला झारखंडमधून राज्यसभेचं तिकीट देण्याच्या मुद्द्यावरून बराच वाद झाला. ते ही गडकरींच्या खास मित्रांमधले समजले जातात. वाद झाल्यामुळे त्यांचं तिकीट गडकरींनी कापलं. आता गडकरी संचेतींवर कारवाई करतील का हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2012 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close