S M L

एमएमआरडीएच्या धर्तीवर पुण्यासाठीही पीएमआरडीए

10 एप्रिलमुंबईला शांघाय बनवण्याचे स्वप्न बाळगुण मुंबई मेट्रो, मोनो रेल्वे, उड्डाणपूल, स्कायवॉक, अशा महत्वाकांक्षी प्रकल्प उभे करणार्‍या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या धर्तीवर पुण्यासाठी पीएमआरडीए प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली. यासंदर्भात एक अभ्यास गट राज्य शासनातर्फे निर्माण करण्यात आला आहे हा अभ्यास गट तीन महिन्यात अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या अभ्यासात एकूण 300 गावांचा यात समावेश असणार आहे तर जवळपास 60 लाख लोकसंख्या असलेली गावं यात असणार आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, लोणावळा, तळेगाव- दाभाडे, देहु या नगरपरिषदा पीएमआरडीएमध्ये असतील तर मावळ, हवेली आणि शिरुर तालुक्याचा काही भागही यात असेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2012 12:07 PM IST

एमएमआरडीएच्या धर्तीवर पुण्यासाठीही पीएमआरडीए

10 एप्रिल

मुंबईला शांघाय बनवण्याचे स्वप्न बाळगुण मुंबई मेट्रो, मोनो रेल्वे, उड्डाणपूल, स्कायवॉक, अशा महत्वाकांक्षी प्रकल्प उभे करणार्‍या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या धर्तीवर पुण्यासाठी पीएमआरडीए प्राधिकरण तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत ही घोषणा केली. यासंदर्भात एक अभ्यास गट राज्य शासनातर्फे निर्माण करण्यात आला आहे हा अभ्यास गट तीन महिन्यात अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या अभ्यासात एकूण 300 गावांचा यात समावेश असणार आहे तर जवळपास 60 लाख लोकसंख्या असलेली गावं यात असणार आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, लोणावळा, तळेगाव- दाभाडे, देहु या नगरपरिषदा पीएमआरडीएमध्ये असतील तर मावळ, हवेली आणि शिरुर तालुक्याचा काही भागही यात असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close