S M L

पु.ल.देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न

10 एप्रिलमहाराष्ट्राचे लाडके दिवगंत साहित्यक पु.ल.देशपांडे यांच्या पुण्यातल्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याच उघड झालं आहे. मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या 'मालतीमाधव' या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याती घटना घडली. मात्र यात काहीही चोरीला गेलं नाही. पण पुस्तकांची नासधूस झाल्याचं समजतंय. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली गेली आहे. पुण्यातल्या मालती माधव या बिल्डींग मधल्या फ्लॅट मध्ये पु.ल देशपांडे आणि सुनिताबाई देशपांडे यांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं. त्यांची पुस्तकं, सामान अशा अनेक गोष्टी अजुनही या घरामध्ये जतन करुन ठेवण्यात आल्या आहे. पु.लंच्या निधनानंतर हे घर बंद करण्यात आले. मंगळवारी पहाटे चोरांनी आधी या बिल्डींग मधल्या इतर घरांना बाहेरुन कड्या घातल्या. चोरांनी दाराच्या कड्या तोडून घरात प्रवेश केला. पण पु.लं.च्या घरात पुस्तक,कादंबरी याशिवाय दुसरे काही नसल्यामुळे चोरांना काहीच सापडले नाही. घरातील कपाटं चोरांनी चाचपडून पाहिली पण काही हाती लागले नाही असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पण पु.लं.च्या घरी चोरी झाल्याची बातमी समजल्यामुळे साहित्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 10, 2012 04:50 PM IST

पु.ल.देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न

10 एप्रिल

महाराष्ट्राचे लाडके दिवगंत साहित्यक पु.ल.देशपांडे यांच्या पुण्यातल्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याच उघड झालं आहे. मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास पुण्यातल्या भांडारकर रोडवरच्या 'मालतीमाधव' या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याती घटना घडली. मात्र यात काहीही चोरीला गेलं नाही. पण पुस्तकांची नासधूस झाल्याचं समजतंय. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली गेली आहे.

पुण्यातल्या मालती माधव या बिल्डींग मधल्या फ्लॅट मध्ये पु.ल देशपांडे आणि सुनिताबाई देशपांडे यांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं. त्यांची पुस्तकं, सामान अशा अनेक गोष्टी अजुनही या घरामध्ये जतन करुन ठेवण्यात आल्या आहे. पु.लंच्या निधनानंतर हे घर बंद करण्यात आले. मंगळवारी पहाटे चोरांनी आधी या बिल्डींग मधल्या इतर घरांना बाहेरुन कड्या घातल्या. चोरांनी दाराच्या कड्या तोडून घरात प्रवेश केला. पण पु.लं.च्या घरात पुस्तक,कादंबरी याशिवाय दुसरे काही नसल्यामुळे चोरांना काहीच सापडले नाही. घरातील कपाटं चोरांनी चाचपडून पाहिली पण काही हाती लागले नाही असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पण पु.लं.च्या घरी चोरी झाल्याची बातमी समजल्यामुळे साहित्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 10, 2012 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close