S M L

भारतीय टीमची 700 वी वन डे

23 नोव्हेंबर क्रिकेटमध्य रेकॉर्ड करण्यात भारतीय खेळाडू आघाडीवर आहेत पण भारतीय टीमनंही त्यांची 700 वी वन डे खेळण्याचा पराक्रम केला आहे. वन डे इतिहासात 700 मॅचचा टप्पा पार करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. एक नजर टाकूया भारतीय टीमच्या आत्तापर्यंतच्या वन डे क्रिकेटच्या प्रवासावर. योगायोग म्हणजे भारत आपली पहली आणि 700वी वन डे इंग्लंडविरुध्दचं खेळला होता. पहिली वन डे झाली 13 जुलै 1974 साली. 700 वन डे मॅच खेळणारा भारत हा क्रिकेट जगतातला पहिला देश ठरला आहे. या 700 वन डे मॅचपैकी भारतानं तब्बल 335 मॅच जिंकल्यात तर 329 मॅचमध्ये भारतीय टीमला पराभव पत्करावा लागला आहे . तीन मॅच टाय झाल्यात तर 33 मॅच अनिर्णीत राहिल्या आहेत. भारतानं पाकिस्तानबरोबर सर्वात जास्त म्हणजे तब्बल 117 मॅच खेळल्यात. भारतानं 2007 मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या वर्ल्ड कपमध्ये वन डेतील 413 हा सर्वात जास्त स्कोर उभारला आहे. 2000 साली शारजामध्ये श्रीलंकेविरुद्ध 54 रन्स हा सर्वात कमी स्कोर होता. भारतानं 2007च्या वर्ल्ड कपमध्ये बर्म्युडाचा 257 रन्सनी पराभव करत वन डेतील सर्वात मोठा विजयही मिळवला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारतासाठी सर्वाधिक म्हणजे 417 वन डे खेळला आहे. त्याचबरोबर वन डे मध्ये सर्वाधिक 16372 रन्सचा आणि सर्वाधिक सेंच्युरीचा वर्ल्ड रेकॉर्डही सचिनच्याच नावावर आहे. अनिल कुंबळे जरी क्रिकेटमधून रिटायर झाला असला तरी त्यानं भारताकडून वन डे करिअरमध्ये सर्वाधिक 337 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. आयसीसीच्या वन डे रँकिंगमध्ये भारतीय टीम सध्या तिस-या क्रमांकावर आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 07:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close