S M L

लवकरच मैदानात परतणार - युवराज

11 एप्रिलवर्डकपच्या दरम्यान श्वास घ्यायला त्रास होत होता. सुरुवातीला मी कुणालाही सांगितलं नाही. मी स्वत:ला सगळं व्यवस्थित असल्याचा दिलासा द्यायचो पण आता आजारातून लवकरच बरा होणार आहे. हा काळ माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता आता मी लवकरच मैदानात परत येणार आहे. देशासाठी परत खेळणे हा सर्वात मोठा क्षण असणार असल्याचही युवराजचं म्हणणं आहे. युवीने आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.अमेरिकेत कॅन्सरवर मात करुन सोमवारी भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग मायदेशी परतला. दिल्लीच्या विमानतळावर युवीचे जल्लोषात स्वागत झाले. आज युवीने पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. या खडतर काळात आई शबनम सिंग यांनी मोठा आधार दिला. आईच्या प्रेमामुळे मला आजाराशी लढण्याची ताकद मिळाली. आता यापुढे तब्येतीची काळजी घेणार, काही दिवस आराम करणार पण मला मैदानावर उतरायचे आहे. देशासाठी परत खेळायचे आहे हा सर्वात मोठा क्षण असणार आहे असं मत युवीने व्यक्त केलं. तसेच मला कॅन्सरपिडीतांसाठी काही काम करण्याची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे काही योजना नाही. आता आजारातून सुखरुप बाहेर पडलो याबद्दल मी देवाचे आभार मानतो. मी कायम आशावादी राहतो काही महिन्यात मी खेळू शकेल असं पुन्हा एकदा युवीने सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 11, 2012 10:59 AM IST

लवकरच मैदानात परतणार - युवराज

11 एप्रिल

वर्डकपच्या दरम्यान श्वास घ्यायला त्रास होत होता. सुरुवातीला मी कुणालाही सांगितलं नाही. मी स्वत:ला सगळं व्यवस्थित असल्याचा दिलासा द्यायचो पण आता आजारातून लवकरच बरा होणार आहे. हा काळ माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होता आता मी लवकरच मैदानात परत येणार आहे. देशासाठी परत खेळणे हा सर्वात मोठा क्षण असणार असल्याचही युवराजचं म्हणणं आहे. युवीने आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

अमेरिकेत कॅन्सरवर मात करुन सोमवारी भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग मायदेशी परतला. दिल्लीच्या विमानतळावर युवीचे जल्लोषात स्वागत झाले. आज युवीने पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. या खडतर काळात आई शबनम सिंग यांनी मोठा आधार दिला. आईच्या प्रेमामुळे मला आजाराशी लढण्याची ताकद मिळाली. आता यापुढे तब्येतीची काळजी घेणार, काही दिवस आराम करणार पण मला मैदानावर उतरायचे आहे. देशासाठी परत खेळायचे आहे हा सर्वात मोठा क्षण असणार आहे असं मत युवीने व्यक्त केलं. तसेच मला कॅन्सरपिडीतांसाठी काही काम करण्याची इच्छा आहे. सध्या माझ्याकडे काही योजना नाही. आता आजारातून सुखरुप बाहेर पडलो याबद्दल मी देवाचे आभार मानतो. मी कायम आशावादी राहतो काही महिन्यात मी खेळू शकेल असं पुन्हा एकदा युवीने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 11, 2012 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close