S M L

पाच महापालिकांसाठी 15 एप्रिलला मतदान

13 एप्रिलपाच महापालिकांसाठी येत्या 15 एप्रिलला मतदान होतं आहे. त्यात लातूर, मालेगाव, भिवंडी-निजामपूर, परभणी, चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे. सर्व 5 महापालिकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. तर महायुती काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळावर लढत आहे. आज या महापालिकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. लातूर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने विलासराव देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर मालेगावमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या कालच्या सभेनंतर मालेगवामध्येही निवडणुकीत रंग भरले गेलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2012 02:44 PM IST

पाच महापालिकांसाठी 15 एप्रिलला मतदान

13 एप्रिल

पाच महापालिकांसाठी येत्या 15 एप्रिलला मतदान होतं आहे. त्यात लातूर, मालेगाव, भिवंडी-निजामपूर, परभणी, चंद्रपूर या महापालिकांचा समावेश आहे. सर्व 5 महापालिकांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढत आहेत. तर महायुती काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळावर लढत आहे. आज या महापालिकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. लातूर महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने विलासराव देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर मालेगावमध्ये राज ठाकरेंनी घेतलेल्या कालच्या सभेनंतर मालेगवामध्येही निवडणुकीत रंग भरले गेलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2012 02:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close