S M L

पाच महापालिकांसाठी उमेदवाराचे भवितव्य 'मशीन' बंद

15 एप्रिलराज्यातील पाच महापालिकांसाठी शांततेत मतदान पार पडलं. सर्वाधिक मतदान परभणीमध्ये 57 टक्के पार पडलं. त्यापाठोपाठ मालेगावमध्ये 54.24 टक्के मतदान झाले. तर भिवंडी महापालिकेसाठी 46 टक्के मतदान झाले. पाच महापालिकांसाठी आता उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले असून त्याचा निकाल उद्या लागणार आहे.पहिल्यांदाच लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. पहिल्या दोन तासात इथं 18.5 टक्के मतदान झालं आणि संध्याकाळपर्यंत 47 टक्के मतदान झाले. पहिल्या महानगरपालिकेत आपली सत्ता यावी यासाठी काँग्रेस , राष्ट्रवादी काँंग्रेस आणि महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करुन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आज सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरवात झाली. 35 प्रभागातील 70 जागांसाठी 418 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर परभणी महापालिके मध्ये एकूण 65 जागांसाठी मतदान होतंय. एकूण 420 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. इथं सर्वाधिक 57 टक्के मतदान झाले आहे. सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार संजय जाधव, काँग्रेसचे आमदार सुरेश देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर महापालिके त 66 जागांसाठी एकूण 458 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, भाजप, प्रहार, युवाशक्ती हे प्रमुख पक्ष लढतीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया, पालकमंत्री संजय देवतळे, भाजपचे खासदार हंसराज अहिर, आमदार नाना शाम्कुले, भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर तिकडे चंद्रपूर महापालिके त 66 जागांसाठी एकूण 458 उमेदवार रिंगणात आहेत. इथं 45 टक्के मतदान झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, भाजप, प्रहार, युवाशक्ती हे प्रमुख पक्ष लढतीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया, पालकमंत्री संजय देवतळे, भाजपचे खासदार हंसराज अहिर, आमदार नाना शाम्कुले, भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2012 02:05 PM IST

पाच महापालिकांसाठी उमेदवाराचे भवितव्य 'मशीन' बंद

15 एप्रिलराज्यातील पाच महापालिकांसाठी शांततेत मतदान पार पडलं. सर्वाधिक मतदान परभणीमध्ये 57 टक्के पार पडलं. त्यापाठोपाठ मालेगावमध्ये 54.24 टक्के मतदान झाले. तर भिवंडी महापालिकेसाठी 46 टक्के मतदान झाले. पाच महापालिकांसाठी आता उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले असून त्याचा निकाल उद्या लागणार आहे.

पहिल्यांदाच लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. पहिल्या दोन तासात इथं 18.5 टक्के मतदान झालं आणि संध्याकाळपर्यंत 47 टक्के मतदान झाले. पहिल्या महानगरपालिकेत आपली सत्ता यावी यासाठी काँग्रेस , राष्ट्रवादी काँंग्रेस आणि महायुती जोरदार शक्तीप्रदर्शन करुन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आज सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरवात झाली. 35 प्रभागातील 70 जागांसाठी 418 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

तर परभणी महापालिके मध्ये एकूण 65 जागांसाठी मतदान होतंय. एकूण 420 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. इथं सर्वाधिक 57 टक्के मतदान झाले आहे. सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार संजय जाधव, काँग्रेसचे आमदार सुरेश देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर महापालिके त 66 जागांसाठी एकूण 458 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, भाजप, प्रहार, युवाशक्ती हे प्रमुख पक्ष लढतीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया, पालकमंत्री संजय देवतळे, भाजपचे खासदार हंसराज अहिर, आमदार नाना शाम्कुले, भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर तिकडे चंद्रपूर महापालिके त 66 जागांसाठी एकूण 458 उमेदवार रिंगणात आहेत. इथं 45 टक्के मतदान झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना, भाजप, प्रहार, युवाशक्ती हे प्रमुख पक्ष लढतीत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया, पालकमंत्री संजय देवतळे, भाजपचे खासदार हंसराज अहिर, आमदार नाना शाम्कुले, भाजपच्या आमदार शोभाताई फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2012 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close