S M L

लातूरमध्ये देशमुखांनी गड राखला

16 एप्रिललातूरच्या पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसने सत्ता काबीज केली. पालिका निवडणुकीत विलासराव देशमुख यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द करुन दाखवले. पहिल्या वहिल्या महापालिकेच्या निवडणुकीत विलासरावांचा हा मोठा विजय मानला जात आहे. लातूरकर कधीही इतरांवर भारी पडतील अशी ग्वाही विलासराव देशमुख यांनी प्रचारसभेत दिली होती आणि आज निकाल लागल्यानंतर लातूरकरांनी आपला कौल काँग्रेसला देत इतरांवर भारी पडले असं टोला विलासरावांनी लगावला. लातूरमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता पटकावली आहे. सर्वाधिक 49 जागा जिंकून महापालिकेवर आपला झेंडा रोवला आहे. विलासराव देशमुख यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना लातूरकरांचे आभार मानले. लातूरच्या विकासासाठी आणखी कामं करणार अशी ग्वाहीही दिली. लातूरमध्ये एकहात्ती सत्ता मिळवण्याचा करिश्मा घडला तो अमित देशमुख यांच्यामुळे. यावेळी अमित यांची पाठ थोपाटत विलासरावांनी सगळ्या कार्यकर्त्यांना विजयाचे श्रेय दिले. लातूरमध्ये राष्ट्रवादीला 13 जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला 6 आणि रिपाइंला 2 जागा मिळाल्यात तर दुसरीकडे सर्व जागांवर लढणार्‍या मनसे आणि भाजपला भोपळा सुध्दा फोडता आला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2012 06:34 AM IST

लातूरमध्ये देशमुखांनी गड राखला

16 एप्रिल

लातूरच्या पहिल्या महापालिकेच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसने सत्ता काबीज केली. पालिका निवडणुकीत विलासराव देशमुख यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द करुन दाखवले. पहिल्या वहिल्या महापालिकेच्या निवडणुकीत विलासरावांचा हा मोठा विजय मानला जात आहे. लातूरकर कधीही इतरांवर भारी पडतील अशी ग्वाही विलासराव देशमुख यांनी प्रचारसभेत दिली होती आणि आज निकाल लागल्यानंतर लातूरकरांनी आपला कौल काँग्रेसला देत इतरांवर भारी पडले असं टोला विलासरावांनी लगावला. लातूरमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता पटकावली आहे. सर्वाधिक 49 जागा जिंकून महापालिकेवर आपला झेंडा रोवला आहे. विलासराव देशमुख यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना लातूरकरांचे आभार मानले. लातूरच्या विकासासाठी आणखी कामं करणार अशी ग्वाहीही दिली. लातूरमध्ये एकहात्ती सत्ता मिळवण्याचा करिश्मा घडला तो अमित देशमुख यांच्यामुळे. यावेळी अमित यांची पाठ थोपाटत विलासरावांनी सगळ्या कार्यकर्त्यांना विजयाचे श्रेय दिले. लातूरमध्ये राष्ट्रवादीला 13 जागांवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला 6 आणि रिपाइंला 2 जागा मिळाल्यात तर दुसरीकडे सर्व जागांवर लढणार्‍या मनसे आणि भाजपला भोपळा सुध्दा फोडता आला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2012 06:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close