S M L

पैशासाठी खोटी लग्न करणार्‍या 'लखोबा लोखंडे'चा पर्दाफाश

सुधाकर काश्यप,मुंबई17 एप्रिलअनेक लग्न करुन नंतर हुंड्यासाठी त्या मुलीचा छळ करणार्‍या अमित नाचणकर याला आणि त्याचे वडिल दिपक नचणकर यांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. नाचणकर बापबेट्यांवर हुंडाबळी तसेच शारिरीक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय स्त्री शक्ति या संस्थेच्या वर्षा तावडे यांच्या प्रयत्नाने या 'लखोबा लोखंडे'चा पर्दाफाश झाला आहे.इतर मुलींप्रमाणे सुजाता आपल्या लग्नाचं स्वप्न पहात होती. तिच्यासाठी वर शोधन सुरु असताना एका दैनिकात वधू पाहिजे असल्याची जाहिरात दिसली. त्यात मुलगा पदवीधर असून बहारिन इथं नोकरी करत असल्याच म्हटलं होतं. ती माहिती अमितची होती. रिती रिवाजा नुसार लग्न झालं. मात्र, पहिल्या दिवसा पासूनचं सुजाताचा छळ सुरु झाला. पुढच्या काही दिवसात सुजाता समोर धक्कादायक सत्य समोर यायला लागलं.सुजाताच्या तक्रारी नंतर बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये अमित आणि त्याचे वडिल दिपक नाचणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्या दोघांना बोरीवलीतील कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आलं असता अमितने आतापर्यत तीन लग्न केल्याचं उघडकीला आलं आहे. त्याने पहिलं लग्न सात वर्षा पूर्वी यवतमाळ मधल्या मुलीशी केलं. पहिल्या बायकोपासून अमितला पाच वर्षाची मुलगीसुध्दा आहे. दुसरं लग्न त्याने सुजाताशी. त्यानंतर लगेचच तीन महिन्यांनी त्याने नाझनीन शेख या मुलीशी लग्न केलं. त्यांच्यावरील गंभीर आरोपांची दखल घेऊन त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली.हे प्रकरण म्हणजे सगळ्याचं पालकांना शिकवणारं आहे. मुलगा उच्च शिक्षित आहे आणि परदेशात आहे या गोष्टींना भाळून लगेच लग्न उरकून टाकू नका असं आवाहन भारतीय स्त्री शक्ति या संस्थेने केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 17, 2012 04:51 PM IST

पैशासाठी खोटी लग्न करणार्‍या 'लखोबा लोखंडे'चा पर्दाफाश

सुधाकर काश्यप,मुंबई

17 एप्रिल

अनेक लग्न करुन नंतर हुंड्यासाठी त्या मुलीचा छळ करणार्‍या अमित नाचणकर याला आणि त्याचे वडिल दिपक नचणकर यांना बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. नाचणकर बापबेट्यांवर हुंडाबळी तसेच शारिरीक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय स्त्री शक्ति या संस्थेच्या वर्षा तावडे यांच्या प्रयत्नाने या 'लखोबा लोखंडे'चा पर्दाफाश झाला आहे.

इतर मुलींप्रमाणे सुजाता आपल्या लग्नाचं स्वप्न पहात होती. तिच्यासाठी वर शोधन सुरु असताना एका दैनिकात वधू पाहिजे असल्याची जाहिरात दिसली. त्यात मुलगा पदवीधर असून बहारिन इथं नोकरी करत असल्याच म्हटलं होतं. ती माहिती अमितची होती. रिती रिवाजा नुसार लग्न झालं. मात्र, पहिल्या दिवसा पासूनचं सुजाताचा छळ सुरु झाला. पुढच्या काही दिवसात सुजाता समोर धक्कादायक सत्य समोर यायला लागलं.

सुजाताच्या तक्रारी नंतर बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये अमित आणि त्याचे वडिल दिपक नाचणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्या दोघांना बोरीवलीतील कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आलं असता अमितने आतापर्यत तीन लग्न केल्याचं उघडकीला आलं आहे. त्याने पहिलं लग्न सात वर्षा पूर्वी यवतमाळ मधल्या मुलीशी केलं. पहिल्या बायकोपासून अमितला पाच वर्षाची मुलगीसुध्दा आहे. दुसरं लग्न त्याने सुजाताशी. त्यानंतर लगेचच तीन महिन्यांनी त्याने नाझनीन शेख या मुलीशी लग्न केलं. त्यांच्यावरील गंभीर आरोपांची दखल घेऊन त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली.

हे प्रकरण म्हणजे सगळ्याचं पालकांना शिकवणारं आहे. मुलगा उच्च शिक्षित आहे आणि परदेशात आहे या गोष्टींना भाळून लगेच लग्न उरकून टाकू नका असं आवाहन भारतीय स्त्री शक्ति या संस्थेने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2012 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close