S M L

अण्णा-बाबांचा देशभर जनजागृती दौरा

20 एप्रिलजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव आज जनआंदोलनासाठी एकत्र आले. येत्या 1 मेपासून भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात तसेच लोकपाल विधेयकासाठी देशभर जनजागृती करण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासाठी बाबा रामदेव देशभर दौरा करणार आहे तर अण्णा हजारे राज्यातील 35 जिल्ह्याच दौरा करणार आहे. अण्णा-बाबा एकत्र आल्यामुळे आंदोलनला दोन नेतृत्वदार मिळाल्यामुळे साहजिकच आंदोलनाच्या ताकदीत वाढ होणार मात्र अण्णा-बाबाच्या युतीमुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी देशव्यापी आंदोलन करुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. तर योगगुरु बाबा रामदेव यांनी काळा पैशाच्या मुद्दा धरुन आंदोलन करुन सरकार दखल घेण्यास भाग पाडले मात्र आंदोलन चिरडल्या गेल्यामुळे देशभरातून सरकारवर टीका झाली. आता आंदोलनातून पाठिंबा देणारे बाबा रामदेव अण्णांच्या मंचावर दाखल झाले आहे. अण्णा आणि बाबा आता देशभरात मोठ आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे. या निमित्तच आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली. अण्णा हजारे यांनी सक्षम लोकायुक्त आणि लोकपाल विधेयकासाठी राज्यातील 35 जिल्ह्यात दौरा करणार आहे. तर याच कालावधीत बाबा रामदेव मध्यप्रदेश, हरियाणा, युपी या भागांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहेत. तसेच 3 जूनला दिल्लीत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. यापुढील दुसर्‍या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये मोठी लढाई लढण्याचा इशाराही दिला. आता अण्णा- बाबाची जोडी आंदोलनाला कोणते वळण देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आणि दुसरीकडे या आंदोलनाची सरकार दरबारी किती दखल घेतली जाते हे पाहण्याचे ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 20, 2012 12:29 PM IST

अण्णा-बाबांचा देशभर जनजागृती दौरा

20 एप्रिल

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव आज जनआंदोलनासाठी एकत्र आले. येत्या 1 मेपासून भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरोधात तसेच लोकपाल विधेयकासाठी देशभर जनजागृती करण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासाठी बाबा रामदेव देशभर दौरा करणार आहे तर अण्णा हजारे राज्यातील 35 जिल्ह्याच दौरा करणार आहे. अण्णा-बाबा एकत्र आल्यामुळे आंदोलनला दोन नेतृत्वदार मिळाल्यामुळे साहजिकच आंदोलनाच्या ताकदीत वाढ होणार मात्र अण्णा-बाबाच्या युतीमुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.

जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी देशव्यापी आंदोलन करुन सरकारला चांगलेच धारेवर धरले. तर योगगुरु बाबा रामदेव यांनी काळा पैशाच्या मुद्दा धरुन आंदोलन करुन सरकार दखल घेण्यास भाग पाडले मात्र आंदोलन चिरडल्या गेल्यामुळे देशभरातून सरकारवर टीका झाली. आता आंदोलनातून पाठिंबा देणारे बाबा रामदेव अण्णांच्या मंचावर दाखल झाले आहे. अण्णा आणि बाबा आता देशभरात मोठ आंदोलन उभं करण्याच्या तयारीत आहे. या निमित्तच आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा केली.

अण्णा हजारे यांनी सक्षम लोकायुक्त आणि लोकपाल विधेयकासाठी राज्यातील 35 जिल्ह्यात दौरा करणार आहे. तर याच कालावधीत बाबा रामदेव मध्यप्रदेश, हरियाणा, युपी या भागांमध्ये जाऊन जनजागृती करणार आहेत. तसेच 3 जूनला दिल्लीत लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. यापुढील दुसर्‍या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये मोठी लढाई लढण्याचा इशाराही दिला. आता अण्णा- बाबाची जोडी आंदोलनाला कोणते वळण देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आणि दुसरीकडे या आंदोलनाची सरकार दरबारी किती दखल घेतली जाते हे पाहण्याचे ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 20, 2012 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close