S M L

ठाण्यात शिवसेनेची काँग्रेसशी हातमिळवणी

19 एप्रिलठाणे महापालिकेत शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला जोर का झटका दिला आहे. पालिकेत राष्ट्रवादी हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असून सुध्दा शिवसेनेच्या महापौरांनी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे दिले आहे. विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने शिवसेनाला खिंडीत पकडण्याच प्रयत्न केला होता. मात्र मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा महापौर निवडून आला. राष्ट्रवादीच्या खेळीचा शिवसेनेनं असा बदला घेतल्याचं यावरुन स्पष्ट दिसत आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून शिवसेनेनं आपली सत्ता स्थापन करुन दाखवली. पण सत्ता स्थापन करत असताना चांगलीच दमछाकही करावी लागली. राष्ट्रवादीने आघाडी करुन, अपक्षांना सोबत घेऊन महापौरपद मिळवण्यासाठी रण केले. यामुळे शिवसेनेच्या गडावर एकच गोंधळ उडाला. मात्र ऐनवेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणि जनतेचा जनादेश पाहुन राज ठाकरे यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला. आणि महापौरपदाचा शिवसेनेचा मार्ग सोपा झाला. पण पुढे स्थायी समिती, विरोधी पक्षनेतेपद अशा पदासाठी 'खिंडीत' लढाई लढल्या गेल्यात. पण यातही इतरांचा पाठिंबा मिळवत खिंडी काबीज करण्यात आल्यात. स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेनं अचानक राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. तर आज शिवसेनेनं आज काँग्रेसशी हातमिळणी करत विरोधीपक्ष नेतेपद देऊ केलं. निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर चिखलफेक करणारे पक्ष राजकारणासाठी आणि सत्तेसाठी एकमेकांच्या गळेत गळे घालत असल्याचे पाहुन मतदारराजा 'सगळे एकाच माळेचे मणी' असं म्हणून आपला राग व्यक्त करत असेल एवढं मात्र खरं..

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 19, 2012 03:04 PM IST

ठाण्यात शिवसेनेची काँग्रेसशी हातमिळवणी

19 एप्रिल

ठाणे महापालिकेत शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला जोर का झटका दिला आहे. पालिकेत राष्ट्रवादी हा दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष असून सुध्दा शिवसेनेच्या महापौरांनी विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे दिले आहे. विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीने शिवसेनाला खिंडीत पकडण्याच प्रयत्न केला होता. मात्र मनसेच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा महापौर निवडून आला. राष्ट्रवादीच्या खेळीचा शिवसेनेनं असा बदला घेतल्याचं यावरुन स्पष्ट दिसत आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून शिवसेनेनं आपली सत्ता स्थापन करुन दाखवली. पण सत्ता स्थापन करत असताना चांगलीच दमछाकही करावी लागली. राष्ट्रवादीने आघाडी करुन, अपक्षांना सोबत घेऊन महापौरपद मिळवण्यासाठी रण केले. यामुळे शिवसेनेच्या गडावर एकच गोंधळ उडाला. मात्र ऐनवेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेला आणि जनतेचा जनादेश पाहुन राज ठाकरे यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला. आणि महापौरपदाचा शिवसेनेचा मार्ग सोपा झाला. पण पुढे स्थायी समिती, विरोधी पक्षनेतेपद अशा पदासाठी 'खिंडीत' लढाई लढल्या गेल्यात. पण यातही इतरांचा पाठिंबा मिळवत खिंडी काबीज करण्यात आल्यात. स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेनं अचानक राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. तर आज शिवसेनेनं आज काँग्रेसशी हातमिळणी करत विरोधीपक्ष नेतेपद देऊ केलं. निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर चिखलफेक करणारे पक्ष राजकारणासाठी आणि सत्तेसाठी एकमेकांच्या गळेत गळे घालत असल्याचे पाहुन मतदारराजा 'सगळे एकाच माळेचे मणी' असं म्हणून आपला राग व्यक्त करत असेल एवढं मात्र खरं..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 19, 2012 03:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close