S M L

अरुण टिक्कू,करण कक्कड हत्येप्रकरणी 2 पोलीस निलंबित

23 एप्रिलमुंबईत गाजत असलेल्या व्यावसायिक अरुण टिक्कू आणि करण कक्कड हत्येप्रकरणी आज दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस इन्सपेक्टर संजय शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशपांडे हे दोन्ही क्राईम ब्रँचचे अधिकारी आहेत. या दोन्ही प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा या दोघांवर आरोप आहे. विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यात होता तेंव्हा पोलिसांच्या व्हॅनमधून फरार झाला होता. यावेळी पोलीस इन्सपेक्टर संजय शिंदे उपस्थित होते त्यांच्या उपस्थित विजयने पळ काढला होता. आज पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली. त्याचबरोबर टिक्कू हत्याप्रकरणी पोलिसांनी आज शेअर दलाल गौतम वोराला अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय पालांडेला मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याआधी मॉडेल विवेका बाबाजी आत्महत्येप्रकरणी गौतम वोराची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी विजय पालांडेला 25 एप्रिलपर्यंत सिमरन सूदला26 एप्रिलपर्यंत आणि गौतम वोराला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2012 12:51 PM IST

अरुण टिक्कू,करण कक्कड हत्येप्रकरणी 2 पोलीस निलंबित

23 एप्रिल

मुंबईत गाजत असलेल्या व्यावसायिक अरुण टिक्कू आणि करण कक्कड हत्येप्रकरणी आज दोन पोलीस अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस इन्सपेक्टर संजय शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशपांडे हे दोन्ही क्राईम ब्रँचचे अधिकारी आहेत. या दोन्ही प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा या दोघांवर आरोप आहे. विजय पालांडे पोलिसांच्या ताब्यात होता तेंव्हा पोलिसांच्या व्हॅनमधून फरार झाला होता. यावेळी पोलीस इन्सपेक्टर संजय शिंदे उपस्थित होते त्यांच्या उपस्थित विजयने पळ काढला होता. आज पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली.

त्याचबरोबर टिक्कू हत्याप्रकरणी पोलिसांनी आज शेअर दलाल गौतम वोराला अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय पालांडेला मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याआधी मॉडेल विवेका बाबाजी आत्महत्येप्रकरणी गौतम वोराची चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी विजय पालांडेला 25 एप्रिलपर्यंत सिमरन सूदला26 एप्रिलपर्यंत आणि गौतम वोराला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2012 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close