S M L

अभिषेक मनू सिंघवींचा राजीनामा

23 एप्रिलवादग्रस्त सीडी प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांना अखेर आपलं पद गमवावं लागलंय. काँग्रेस प्रवक्ते पद तसेच संसदेच्या न्याय आणि विधी विभागाच्या स्थायी समितीपदावरून त्यांनी राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून सिंघवींचं हे सीडी प्रकरण गाजतंय. ही वादग्रस्त सीडी दाखवली जाऊ नये, यासाठी सिंघवींनी दिल्ली हायकोर्टाकडून स्थगितीचे आदेश मिळवले होते. त्यावर स्थगितीचे आदेश मिळवले होते. तरीसुद्धा सोशल मीडियावर ही सीडी टाकण्यात आली होती. ही सीडी सिंघवी यांच्या माजी ड्रायव्हरनच तयार केली होती. नंतर त्याने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि ही सीडी बनावट असल्याचं मान्य केलं, असा दावा सिंघवी यांनी केला होता. तरीही सोशल मीडियावर ही सीडी टाकण्यात आल्याने सिंघवींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गेल्या चार दिवसांपासून सिंघवी विरुद्ध सोशल मीडिया असा वाद रंगला होता. सीडीचा वाद सुरू झाल्यापासून काँग्रेसने सिंघवी यांना पत्रकार परिषदांपासून दूर ठेवलं होतं. आज त्यांना अखेर आपल्या संसदीय पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि हा राजीनामा ताबडतोब स्वीकारला गेला. अभिषेक मनु सिंघवी यांनी एक पत्रक काढून यावर स्पष्टिकरण दिलंय. अभिषेक मनु सिंघवी म्हणतात, 'स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतलाय. तसं काँग्रेस अध्यक्षांना कळवलंही आहे. प्रवक्तेपदावरूनही पायउतार होण्याचा मी निर्णय घेतला. माझ्याशी संबंधित जी छेडछाड केलेली सीडी पसरवण्यात आली, त्यामुळे संसदीय कामकाजात थोडाही अडसर येऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतलाय. पक्षाची शिस्त पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून पक्षाला माझ्यामुळे त्रास व्हावा, हे मला मान्य नाही. माझ्याविरोधातले सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. सीडीतल्या संभाषणाबद्दल अफवा आणि निराधार आरोप पसरवण्यात येत आहेत.(सीडीतल्या महिला वकिलाला मी) विशिष्ट पदाचं आमिष देत असल्याची अफवा काही माध्यमातून पसरवण्यात आली. पण सीडीमध्ये मुळात तसं काहीही नाही. हे कपोलकल्पित आहे आणि विरोधकांचा खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे. सीडी खरी आहे असं काही वेळासाठी गृहित धरलं (वास्तवात ती खरी नाहीये) तरीही त्यामध्ये जे दाखवण्यात आलंय, ते परस्पर सहमतीनं करण्यात आलं, असं दिसतंय. त्यामुळे त्याविरोधात तक्रार करण्याचा अधिकार केवळ दोघांच्या कुटुंबीयांना आहे. आणि माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी आहेत. या सीडीशी करण्यात आलेली छेडछाड आणि नंतर पसरवलेल्या अफवा खेदजनक आहेत. ही सीडी बनवणार्‍या ड्रायव्हरनं दिलेल्या जबाबावरून ही सीडी का बनवली, हे स्पष्ट होतंय. या खटल्यात सह-प्रतिवादी जे मीडिया हाऊस आहे, त्यानंही ड्रायव्हरच्या मताशी सहमती दर्शवणारा जबाब दिलाय. ड्रायव्हरनं मला धमक्या देणारे एसएमएस पाठवले होते. ते ही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रेकॉर्ड करण्यात आले होते. त्यावर पोलीस तक्रारही दाखल केली होती. सीडीशी छेडछाड केली असले किंवा नसेल. दोन्ही स्थितीत याचा लोकहिताशी संबंध नाही. राजकीय व्यक्ती असो किंवा इतर कुणी असो, प्रत्येकाच्या खासगी बाबींचा आदर राखला गेला पाहिजे.अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर लागलेल्या आरोपामुळे काँग्रेसचंही मोठं नुकसान झालंय. अभिषेक मनू सिंघवी- हे उत्कृष्ट कायदेतज्ज्ञ आहे- काँग्रेस कायदा विभागाचे प्रमुख - उत्तम वक्ता असल्यामुळे राज्यसभेत काँग्रेसची बाजू मांडण्याची जबाबदारी- काँग्रेस नेत्यांविरोधातले खटले लढवणं किंवा सल्ला देण्याची जबाबदारीउत्तम प्रवक्ते- बॅरिस्टर गाडगीळांनंतर काँग्रेसला मिळालेला उत्तम प्रवक्ता म्हणून ओळख- इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी लागणारा हजरजबाबीपणा - कधीही कुठल्या वादात अडकले नाही

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 23, 2012 01:04 PM IST

अभिषेक मनू सिंघवींचा राजीनामा

23 एप्रिल

वादग्रस्त सीडी प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांना अखेर आपलं पद गमवावं लागलंय. काँग्रेस प्रवक्ते पद तसेच संसदेच्या न्याय आणि विधी विभागाच्या स्थायी समितीपदावरून त्यांनी राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून सिंघवींचं हे सीडी प्रकरण गाजतंय. ही वादग्रस्त सीडी दाखवली जाऊ नये, यासाठी सिंघवींनी दिल्ली हायकोर्टाकडून स्थगितीचे आदेश मिळवले होते. त्यावर स्थगितीचे आदेश मिळवले होते.

तरीसुद्धा सोशल मीडियावर ही सीडी टाकण्यात आली होती. ही सीडी सिंघवी यांच्या माजी ड्रायव्हरनच तयार केली होती. नंतर त्याने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि ही सीडी बनावट असल्याचं मान्य केलं, असा दावा सिंघवी यांनी केला होता. तरीही सोशल मीडियावर ही सीडी टाकण्यात आल्याने सिंघवींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. गेल्या चार दिवसांपासून सिंघवी विरुद्ध सोशल मीडिया असा वाद रंगला होता. सीडीचा वाद सुरू झाल्यापासून काँग्रेसने सिंघवी यांना पत्रकार परिषदांपासून दूर ठेवलं होतं. आज त्यांना अखेर आपल्या संसदीय पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि हा राजीनामा ताबडतोब स्वीकारला गेला.

अभिषेक मनु सिंघवी यांनी एक पत्रक काढून यावर स्पष्टिकरण दिलंय. अभिषेक मनु सिंघवी म्हणतात, 'स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतलाय. तसं काँग्रेस अध्यक्षांना कळवलंही आहे. प्रवक्तेपदावरूनही पायउतार होण्याचा मी निर्णय घेतला. माझ्याशी संबंधित जी छेडछाड केलेली सीडी पसरवण्यात आली, त्यामुळे संसदीय कामकाजात थोडाही अडसर येऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतलाय. पक्षाची शिस्त पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे. म्हणून पक्षाला माझ्यामुळे त्रास व्हावा, हे मला मान्य नाही. माझ्याविरोधातले सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. सीडीतल्या संभाषणाबद्दल अफवा आणि निराधार आरोप पसरवण्यात येत आहेत.

(सीडीतल्या महिला वकिलाला मी) विशिष्ट पदाचं आमिष देत असल्याची अफवा काही माध्यमातून पसरवण्यात आली. पण सीडीमध्ये मुळात तसं काहीही नाही. हे कपोलकल्पित आहे आणि विरोधकांचा खळबळ माजवण्याचा प्रयत्न आहे. सीडी खरी आहे असं काही वेळासाठी गृहित धरलं (वास्तवात ती खरी नाहीये) तरीही त्यामध्ये जे दाखवण्यात आलंय, ते परस्पर सहमतीनं करण्यात आलं, असं दिसतंय. त्यामुळे त्याविरोधात तक्रार करण्याचा अधिकार केवळ दोघांच्या कुटुंबीयांना आहे. आणि माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी आहेत.

या सीडीशी करण्यात आलेली छेडछाड आणि नंतर पसरवलेल्या अफवा खेदजनक आहेत. ही सीडी बनवणार्‍या ड्रायव्हरनं दिलेल्या जबाबावरून ही सीडी का बनवली, हे स्पष्ट होतंय. या खटल्यात सह-प्रतिवादी जे मीडिया हाऊस आहे, त्यानंही ड्रायव्हरच्या मताशी सहमती दर्शवणारा जबाब दिलाय. ड्रायव्हरनं मला धमक्या देणारे एसएमएस पाठवले होते. ते ही मार्चच्या शेवटच्या आठवड्यात रेकॉर्ड करण्यात आले होते. त्यावर पोलीस तक्रारही दाखल केली होती.

सीडीशी छेडछाड केली असले किंवा नसेल. दोन्ही स्थितीत याचा लोकहिताशी संबंध नाही. राजकीय व्यक्ती असो किंवा इतर कुणी असो, प्रत्येकाच्या खासगी बाबींचा आदर राखला गेला पाहिजे.

अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर लागलेल्या आरोपामुळे काँग्रेसचंही मोठं नुकसान झालंय. अभिषेक मनू सिंघवी

- हे उत्कृष्ट कायदेतज्ज्ञ आहे- काँग्रेस कायदा विभागाचे प्रमुख - उत्तम वक्ता असल्यामुळे राज्यसभेत काँग्रेसची बाजू मांडण्याची जबाबदारी- काँग्रेस नेत्यांविरोधातले खटले लढवणं किंवा सल्ला देण्याची जबाबदारी

उत्तम प्रवक्ते- बॅरिस्टर गाडगीळांनंतर काँग्रेसला मिळालेला उत्तम प्रवक्ता म्हणून ओळख- इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी लागणारा हजरजबाबीपणा - कधीही कुठल्या वादात अडकले नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2012 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close