S M L

नॉर्वे सरकारच्या ताब्यातील दोन्ही मुलं भारतात परतली

24 एप्रिलनॉर्वे सरकारच्या ताब्यात असलेली अभिज्ञान आणि ऐश्वर्या भट्टाचार्य ही मुलं तब्बल वर्षभरानंतर आज भारतात परतली. परराष्ट्र राज्यमंत्री परणीत कौर आणि मुलांच्या नातेवाईकांनी त्यांचं नवी दिल्लीच्या विमानतळावर स्वागत केलं. नॉर्वेचे अधिकारी त्यांना घेऊन दिल्लीत आले. नॉर्वेच्या कोर्टाने मुलांना त्यांच्या काकांच्या स्वाधीन करण्याचा निकाल दिला होता. मुलांना योग्य वागणूक दिली जात नाही या कारणांवरून अभिज्ञान आणि ऐश्वर्या या बहिण-भावांना नॉर्वेच्या चाईल्ड प्रोटेक्शन शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावर देशभर वादळ उठले होते. दोघंही मुलं आज दिल्लीतच राहणार असून उद्या कोलकत्याला जाणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2012 11:05 AM IST

नॉर्वे सरकारच्या ताब्यातील दोन्ही मुलं भारतात परतली

24 एप्रिल

नॉर्वे सरकारच्या ताब्यात असलेली अभिज्ञान आणि ऐश्वर्या भट्टाचार्य ही मुलं तब्बल वर्षभरानंतर आज भारतात परतली. परराष्ट्र राज्यमंत्री परणीत कौर आणि मुलांच्या नातेवाईकांनी त्यांचं नवी दिल्लीच्या विमानतळावर स्वागत केलं. नॉर्वेचे अधिकारी त्यांना घेऊन दिल्लीत आले. नॉर्वेच्या कोर्टाने मुलांना त्यांच्या काकांच्या स्वाधीन करण्याचा निकाल दिला होता. मुलांना योग्य वागणूक दिली जात नाही या कारणांवरून अभिज्ञान आणि ऐश्वर्या या बहिण-भावांना नॉर्वेच्या चाईल्ड प्रोटेक्शन शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावर देशभर वादळ उठले होते. दोघंही मुलं आज दिल्लीतच राहणार असून उद्या कोलकत्याला जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close