S M L

काँग्रेसचे 4 मंत्री राजीनामा देणार ?

24 एप्रिलकेंद्रीय मंत्रिमंडळ आणि काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक दूर असली. तरी आतापासूनच राजधानीतलं वातावणर तापलंय. केंद्रातल्या 4 मंत्र्यांनी पक्षाच्या कामासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला आहे. त्यामुळे केंद्रात आणि काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातले काँग्रेसचे 4 ज्येष्ठ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. कायदा मंत्री सलमान खुर्शीद, ग्रामविकास मंत्री जयराम रमेश, आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद आणि प्रवासी भारतीय व्यवहार मंत्री वायलर रवी यांनी ही इच्छा व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आखलेल्या कामराज योजनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या चार मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन पक्षकार्यासाठी झोकून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मंत्र्यांनी सरकारपेक्षा पक्षासाठी काम करण्याची इच्छा सोनिया गांधींकडे बोलून दाखवल्याची माहिती आयबीएन नेटवर्कला मिळालीय. 2014 ची लोकसभा निवडणूक ही राहुल गांधींसाठी मोठी संधी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे काँग्रेस आणि सरकारमध्ये मोठे फेरबदल करण्याची सोनिया गांधीची योजना आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षात मातब्बर चेहरे सक्रीय व्हावेत, हाच यामागचा हेतू आहेयूपीए 2 सरकार सध्या घसरणीला लागलंय. गेल्या काही निवडणुकींमधले खराब निकाल, सरकारचा ढिसाळ कारभार यामुळे येणारी लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी कसोटीच असेल. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या खराब कामगिरीचं खापर सलमान खुर्शीदांवरही फोडण्यात येतंय. त्यामुळे आपल्या राजकीय करिअरला वाचवण्याचा खुर्शीद यांचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय. वायलर रवी यांनी मात्र राजीनाम्याच्या बातमीचं खंडन केलंय. पण गेल्या काही दिवसांपासून रवी आंध्र प्रदेशच्या राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना पक्ष संघटनेत पुन्हा घेतलं जाईल, अशी शक्यता आहे.असं असलं तरी काही प्रश्न अनुत्तरीत राहतातही योजना यशस्वी होईल का ?ही फक्त वरवरची उपाययोजना ठरेल का ?हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का ?रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार ?यामुळे काहीच उपयोग होणार नाही, असं विरोधकांना वाटतं. 1964 मध्ये यशस्वी ठरलेली ही योजना 2014 मध्ये किती यशस्वी होईल, हे पाहावं लागेल.ज्या चार मंत्र्यांनी आज राजीनामा देऊन पक्षाच्या कामात झोकून देण्याची इच्छा व्यक्त केलीय, हे चारही मंत्री काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचे मंत्री आहेत. बघूया या मंत्र्यांची बलस्थानं काय आहेत. सलमान खुर्शीद - 2004च्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागे महत्त्वाची भूमिका- उत्तर प्रदेशातले महत्त्वाचे मुस्लिम नेते- उत्तर भारतातल्या राजकारणाची चांगली जाणगुलाम नबी आझाद- पक्ष संघटनेची चांगली जाण- अनेक राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी- महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचे माजी प्रभारी- देशभर चांगल्या ओळखी- सोनिया गांधींचे निष्ठावंतजयराम रमेश- स्वच्छ आणि पुरोगामी प्रतिमा- आंध्र प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातले नेते- 2009च्या लोकसभा निवडणुकीसाठीही दिला होता राजीनामावायलर रवी- अनेक राज्यांच्या प्रभारीपदाचा अनुभव- केरळच्या दृष्टीने महत्त्वाचे नेते- हवाई वाहतूक मंत्रिपद गेल्यामुळे नाराजकाँग्रेसच्या चार मंत्र्यांनी राजीनामे देऊन पक्षासाठी काम करण्याची इच्छा बोलून दाखवलीय. ही 'नवा कामराज प्लॅन' असल्याचं बोललं जातंय. पाहूयात कोण होते कामराज आणि काय होती त्यांची मूळ 'कामराज योजना'..- काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. कामराज यांनी 1963मध्ये एक राजकीय योजना बनवली होती- याच योजनेला 'कामराज योजना' असं म्हणतात- काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामे देऊन पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी काम करावं, अशी ही योजना होती- तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचाही या योजनेला पाठिंबा होता- योजनेनुसार 6 केंद्रीय मंत्री आणि 6 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पदाचे राजीनामे दिले- त्यात लाल बहादुर शास्त्री, जगजीवन राम, मोरारजी देसाई, बिजू पटनाईक आणि एस. के. पाटील यांचा समावेश होता- 1964 साली कामराज यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली- जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर कामराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 24, 2012 06:07 PM IST

काँग्रेसचे 4 मंत्री राजीनामा देणार ?

24 एप्रिल

केंद्रीय मंत्रिमंडळ आणि काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक दूर असली. तरी आतापासूनच राजधानीतलं वातावणर तापलंय. केंद्रातल्या 4 मंत्र्यांनी पक्षाच्या कामासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ केला आहे. त्यामुळे केंद्रात आणि काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातले काँग्रेसचे 4 ज्येष्ठ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. कायदा मंत्री सलमान खुर्शीद, ग्रामविकास मंत्री जयराम रमेश, आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद आणि प्रवासी भारतीय व्यवहार मंत्री वायलर रवी यांनी ही इच्छा व्यक्त करणारे पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिल्याची सूत्रांची माहिती आहे.

काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आखलेल्या कामराज योजनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या या चार मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे देऊन पक्षकार्यासाठी झोकून देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मंत्र्यांनी सरकारपेक्षा पक्षासाठी काम करण्याची इच्छा सोनिया गांधींकडे बोलून दाखवल्याची माहिती आयबीएन नेटवर्कला मिळालीय.

2014 ची लोकसभा निवडणूक ही राहुल गांधींसाठी मोठी संधी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे काँग्रेस आणि सरकारमध्ये मोठे फेरबदल करण्याची सोनिया गांधीची योजना आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षात मातब्बर चेहरे सक्रीय व्हावेत, हाच यामागचा हेतू आहे

यूपीए 2 सरकार सध्या घसरणीला लागलंय. गेल्या काही निवडणुकींमधले खराब निकाल, सरकारचा ढिसाळ कारभार यामुळे येणारी लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी कसोटीच असेल. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या खराब कामगिरीचं खापर सलमान खुर्शीदांवरही फोडण्यात येतंय. त्यामुळे आपल्या राजकीय करिअरला वाचवण्याचा खुर्शीद यांचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जातंय.

वायलर रवी यांनी मात्र राजीनाम्याच्या बातमीचं खंडन केलंय. पण गेल्या काही दिवसांपासून रवी आंध्र प्रदेशच्या राजकारणात सक्रीय होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना पक्ष संघटनेत पुन्हा घेतलं जाईल, अशी शक्यता आहे.असं असलं तरी काही प्रश्न अनुत्तरीत राहतात

ही योजना यशस्वी होईल का ?ही फक्त वरवरची उपाययोजना ठरेल का ?हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का ?रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार ?

यामुळे काहीच उपयोग होणार नाही, असं विरोधकांना वाटतं. 1964 मध्ये यशस्वी ठरलेली ही योजना 2014 मध्ये किती यशस्वी होईल, हे पाहावं लागेल.

ज्या चार मंत्र्यांनी आज राजीनामा देऊन पक्षाच्या कामात झोकून देण्याची इच्छा व्यक्त केलीय, हे चारही मंत्री काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाचे मंत्री आहेत. बघूया या मंत्र्यांची बलस्थानं काय आहेत.

सलमान खुर्शीद - 2004च्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागे महत्त्वाची भूमिका- उत्तर प्रदेशातले महत्त्वाचे मुस्लिम नेते- उत्तर भारतातल्या राजकारणाची चांगली जाण

गुलाम नबी आझाद- पक्ष संघटनेची चांगली जाण- अनेक राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी- महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांचे माजी प्रभारी- देशभर चांगल्या ओळखी- सोनिया गांधींचे निष्ठावंत

जयराम रमेश- स्वच्छ आणि पुरोगामी प्रतिमा- आंध्र प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यातले नेते- 2009च्या लोकसभा निवडणुकीसाठीही दिला होता राजीनामा

वायलर रवी- अनेक राज्यांच्या प्रभारीपदाचा अनुभव- केरळच्या दृष्टीने महत्त्वाचे नेते- हवाई वाहतूक मंत्रिपद गेल्यामुळे नाराजकाँग्रेसच्या चार मंत्र्यांनी राजीनामे देऊन पक्षासाठी काम करण्याची इच्छा बोलून दाखवलीय. ही 'नवा कामराज प्लॅन' असल्याचं बोललं जातंय. पाहूयात कोण होते कामराज आणि काय होती त्यांची मूळ 'कामराज योजना'..

- काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. कामराज यांनी 1963मध्ये एक राजकीय योजना बनवली होती- याच योजनेला 'कामराज योजना' असं म्हणतात- काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ मंत्र्यांनी राजीनामे देऊन पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी काम करावं, अशी ही योजना होती- तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचाही या योजनेला पाठिंबा होता- योजनेनुसार 6 केंद्रीय मंत्री आणि 6 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पदाचे राजीनामे दिले- त्यात लाल बहादुर शास्त्री, जगजीवन राम, मोरारजी देसाई, बिजू पटनाईक आणि एस. के. पाटील यांचा समावेश होता- 1964 साली कामराज यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली- जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर कामराज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2012 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close