S M L

लोकायुक्तसाठी अण्णांचा एल्गार

25 एप्रिललोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या तख्ताला हादरे देत सरकाराला दखल घेण्यास भाग पाडले. आता लोकायुक्त कायद्यासाठी अण्णांनी आपला मोर्चा राज्याकडे वळवला आहे. आज पुन्हा एकदा अण्णांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहुन हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाच नाही, जनलोकायुक्त कायदा पास न करणं हा घटनेचा अवमान आहे, असं सांगत अण्णांनी महाराष्ट्रातल्या जनतेने आता संघर्षासाठी तयार राहावं असं आवाहन केलं आहे. आता आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे असंही अण्णांनी ठणकावून सांगितले. राज्यात लोकायुक्त कायदा आणण्यासाठी आणि लोकपाल विधेयकाच्या जनजागृतीसाठी अण्णा हजारे यांनी 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यभरात दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय. ठरल्याप्रमाणे अण्णांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अण्णांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आठवले यांनी अण्णांना पाठिंबा दिला. लोकपाल विधेयकासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंानी दिलेल्या घटनेची चौकट मोडणारं नाही असं आश्वासन अण्णांनी दिलं.उद्या सकाळी अण्णा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही अण्णा घेण्याची भेट शक्यता आहे. तसेच अण्णांनी बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे स्पष्ट केलं. यावेळी अण्णांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. मुख्यमंत्री आमच्या पत्रांना उत्तरं देत नाहीत आणि महाराष्ट्र सरकार आश्‍वासनं पाळत नाही. मुळात भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाच नाही, जनलोकायुक्त कायदा पास न करणं हा घटनेचा अवमान आहे, असं अण्णांनी ठणकावून सांगितले. या सरकारला जाग करण्यासाठी आता आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे यासाठी महाराष्ट्रवासीयांनी संघर्षासाठी तयार राहावं असं आवाहन अण्णांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 25, 2012 03:50 PM IST

लोकायुक्तसाठी अण्णांचा एल्गार

25 एप्रिल

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या तख्ताला हादरे देत सरकाराला दखल घेण्यास भाग पाडले. आता लोकायुक्त कायद्यासाठी अण्णांनी आपला मोर्चा राज्याकडे वळवला आहे. आज पुन्हा एकदा अण्णांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहुन हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाच नाही, जनलोकायुक्त कायदा पास न करणं हा घटनेचा अवमान आहे, असं सांगत अण्णांनी महाराष्ट्रातल्या जनतेने आता संघर्षासाठी तयार राहावं असं आवाहन केलं आहे. आता आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे असंही अण्णांनी ठणकावून सांगितले.

राज्यात लोकायुक्त कायदा आणण्यासाठी आणि लोकपाल विधेयकाच्या जनजागृतीसाठी अण्णा हजारे यांनी 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनापासून राज्यभरात दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय. ठरल्याप्रमाणे अण्णांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. अण्णांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आठवले यांनी अण्णांना पाठिंबा दिला. लोकपाल विधेयकासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यंानी दिलेल्या घटनेची चौकट मोडणारं नाही असं आश्वासन अण्णांनी दिलं.उद्या सकाळी अण्णा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही अण्णा घेण्याची भेट शक्यता आहे. तसेच अण्णांनी बाळासाहेब ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याचे स्पष्ट केलं.

यावेळी अण्णांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. मुख्यमंत्री आमच्या पत्रांना उत्तरं देत नाहीत आणि महाराष्ट्र सरकार आश्‍वासनं पाळत नाही. मुळात भ्रष्टाचाराला आळा घालण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाच नाही, जनलोकायुक्त कायदा पास न करणं हा घटनेचा अवमान आहे, असं अण्णांनी ठणकावून सांगितले. या सरकारला जाग करण्यासाठी आता आंदोलन हाच एकमेव पर्याय आहे यासाठी महाराष्ट्रवासीयांनी संघर्षासाठी तयार राहावं असं आवाहन अण्णांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 25, 2012 03:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close