S M L

संसदेत दणाणल्या बोफोर्स घोटाळ्याच्या तोफा

26 एप्रिलबोफोर्स घोटाळ्याप्रकरणी स्टेन लिंडस्ट्रॉर्म यांच्या खुलाशानंतर पुन्हा एकदा बोफोर्सचं भूत बाहेर आलं आहे. विरोधकांनी या घोटाळ्याची न्यायालयीन आयोगाकडून चौकशीची मागणी करत संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. पण, काँग्रेसने मात्र ही मागणी फेटाळून लावली.25 वर्षांनंतर.. पुन्हा एकदा बोफोर्स घोटाळ्याच्या तोफांनी संसद दणाणली. स्वीडन पोलीस प्रमुख स्टेन लिंडस्ट्रॉर्म यांनी बोफोर्सप्रकरणी जे खुलासे केले, त्यामुळे विरोधकांना ऐताच दारूगोळा मिळाला. त्यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये याच विषयावर चर्चेची जोरदार मागणी केली. घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरू करावा आणि न्यायालयीन आयोगाची स्थापना करावी, या त्यांचा प्रमुख मागण्या होत्या. पण काँग्रेसने या मागण्या धुडकावल्या. भाजपनं काँग्रेसला अडचणीत आणणारे काही प्रश्नही विचारले.- सीबीआय अधिकारी स्वीडनच्या तपास अधिकार्‍यांना का भेटले नाही?- क्वात्रोचीला देशाबाहेर का जाऊ देण्यात आलं?- क्वात्रोचीविरोधातली रेड कॉर्नर नोटीस का मागे घेण्यात आली?25 वर्षं उलटल्यानंतर.. आणि क्वात्रोचीसोडून सर्व संबंधित मरण पावल्यामुळे आता पुन्हा या प्रकरणाचा तपास होण्याची शक्यता कमी आहे. पण कारगिलचं युद्ध जिंकवणार्‍या बोफोर्सच्या तोफा जोवर धडाडतायत, तोवर बोफोर्स घोटाळ्याचं भूतही जिवंत राहील अशीच चिन्हं दिसत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 26, 2012 05:09 PM IST

संसदेत दणाणल्या बोफोर्स घोटाळ्याच्या तोफा

26 एप्रिल

बोफोर्स घोटाळ्याप्रकरणी स्टेन लिंडस्ट्रॉर्म यांच्या खुलाशानंतर पुन्हा एकदा बोफोर्सचं भूत बाहेर आलं आहे. विरोधकांनी या घोटाळ्याची न्यायालयीन आयोगाकडून चौकशीची मागणी करत संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. पण, काँग्रेसने मात्र ही मागणी फेटाळून लावली.25 वर्षांनंतर.. पुन्हा एकदा बोफोर्स घोटाळ्याच्या तोफांनी संसद दणाणली. स्वीडन पोलीस प्रमुख स्टेन लिंडस्ट्रॉर्म यांनी बोफोर्सप्रकरणी जे खुलासे केले, त्यामुळे विरोधकांना ऐताच दारूगोळा मिळाला. त्यांनी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये याच विषयावर चर्चेची जोरदार मागणी केली. घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरू करावा आणि न्यायालयीन आयोगाची स्थापना करावी, या त्यांचा प्रमुख मागण्या होत्या. पण काँग्रेसने या मागण्या धुडकावल्या.

भाजपनं काँग्रेसला अडचणीत आणणारे काही प्रश्नही विचारले.- सीबीआय अधिकारी स्वीडनच्या तपास अधिकार्‍यांना का भेटले नाही?- क्वात्रोचीला देशाबाहेर का जाऊ देण्यात आलं?- क्वात्रोचीविरोधातली रेड कॉर्नर नोटीस का मागे घेण्यात आली?

25 वर्षं उलटल्यानंतर.. आणि क्वात्रोचीसोडून सर्व संबंधित मरण पावल्यामुळे आता पुन्हा या प्रकरणाचा तपास होण्याची शक्यता कमी आहे. पण कारगिलचं युद्ध जिंकवणार्‍या बोफोर्सच्या तोफा जोवर धडाडतायत, तोवर बोफोर्स घोटाळ्याचं भूतही जिवंत राहील अशीच चिन्हं दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2012 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close