S M L

'आदर्श'मध्ये विलासरावांच्या बेनामी फ्लॅट;चौकशीची मागणी

27 एप्रिलवादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बेनामी दोन फ्लॅट आहेत. याबाबतचे अनेक पुरावे समोर आले आहेत. यामुळे विलासराव देशमुख यांच्या या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रविण वाटेगावकर यांनी केली. आदर्श प्रकरणी वेगवेगळ्या जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल आहेत. आदर्श सोसायटीत अनेक राजकारण्यांचे बेनामी फ्लॅट आहेत. आदर्श सोसायटीतील सर्व बेनामी फ्लॅट कुणाचे आहेत हे शोधून काढावं आणि संबंधितांवर कारवाई करावी अशा मागणीची जनहित याचिका वाटेगावकर यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयची कारवाई तर सुरू आहे. पण यावेळी विलासराव देशमुख यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही यामुळे काल मुंबई हायकोर्टात वाटेगावकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. या प्रतिज्ञापत्रात विलासराव देशमुख यांच्या बेनामी फ्लॅटबाबतचे कागदपत्र जोडले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2012 09:52 AM IST

'आदर्श'मध्ये विलासरावांच्या बेनामी फ्लॅट;चौकशीची मागणी

27 एप्रिल

वादग्रस्त आदर्श सोसायटी प्रकरणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बेनामी दोन फ्लॅट आहेत. याबाबतचे अनेक पुरावे समोर आले आहेत. यामुळे विलासराव देशमुख यांच्या या बेनामी मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रविण वाटेगावकर यांनी केली. आदर्श प्रकरणी वेगवेगळ्या जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल आहेत. आदर्श सोसायटीत अनेक राजकारण्यांचे बेनामी फ्लॅट आहेत. आदर्श सोसायटीतील सर्व बेनामी फ्लॅट कुणाचे आहेत हे शोधून काढावं आणि संबंधितांवर कारवाई करावी अशा मागणीची जनहित याचिका वाटेगावकर यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयची कारवाई तर सुरू आहे. पण यावेळी विलासराव देशमुख यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही यामुळे काल मुंबई हायकोर्टात वाटेगावकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलंय. या प्रतिज्ञापत्रात विलासराव देशमुख यांच्या बेनामी फ्लॅटबाबतचे कागदपत्र जोडले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2012 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close