S M L

पुण्यात हुक्का पार्लरवर छापा,21 जण ताब्यात

28 एप्रिलपुण्यात शिवाजीनगर येथे रेंज हिल्स कॉर्नर भागात हुक्का पार्लर चालविणार्‍या इन्व्हिटेशन या गार्डन रेस्टॉरेटवर काल रात्री पुणे पोलिसांनी धाड टाकून सात मुलं आणि 15 मुलींना ताब्यात घेतलं आहे. सामजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख भाणूप्रताप बर्गे आणि पुणे पोलिसांनी हा छापा घातला. इथं बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविला जात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. मागिल आठवड्यातच एमजी रोडवर एका हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर आज कारवाई करत रेंज हिल्स कॉर्नर भागात हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात तरुण-तरुणींसह हॉटेलच्या कर्मचार्‍यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी हॉटेलमधून हुक्का, हुक्काचे वेगवेगळे फ्लेवर्स,तंबाखू जप्त करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 02:26 PM IST

पुण्यात हुक्का पार्लरवर छापा,21 जण ताब्यात

28 एप्रिल

पुण्यात शिवाजीनगर येथे रेंज हिल्स कॉर्नर भागात हुक्का पार्लर चालविणार्‍या इन्व्हिटेशन या गार्डन रेस्टॉरेटवर काल रात्री पुणे पोलिसांनी धाड टाकून सात मुलं आणि 15 मुलींना ताब्यात घेतलं आहे. सामजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख भाणूप्रताप बर्गे आणि पुणे पोलिसांनी हा छापा घातला. इथं बेकायदेशीर हुक्का पार्लर चालविला जात असल्याची माहिती पोलिसांकडे होती. मागिल आठवड्यातच एमजी रोडवर एका हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर आज कारवाई करत रेंज हिल्स कॉर्नर भागात हुक्का पार्लरवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात तरुण-तरुणींसह हॉटेलच्या कर्मचार्‍यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी हॉटेलमधून हुक्का, हुक्काचे वेगवेगळे फ्लेवर्स,तंबाखू जप्त करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 02:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close