S M L

इस्कॉन संस्था वादात

28 एप्रिलइस्कॉन म्हणून ओळखली जाणारी मुंबईतली इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस वादात सापडली आहे. या सोसायटीच्या सदस्यांवर अफरातफर आणि गुन्हेगारी कटाचे गंभीर गुन्हे आहेत. इस्कॉन...पाश्चिमात्य देशांना भगवान श्रीकृष्णाविषयी ज्ञान देणारी भारतातली अग्रगण्य संस्था...पण, आपली ही ओळख टिकवण्यासाठी इस्कॉन सध्या झगडतेय. घोटाळे, भ्रष्टाचार, आणि संस्थेतला अंतर्गत वाद, यामुळे इस्कॉन वादात सापडली आहे. इस्कॉनचं हे न्यूजलेटर...यात इथल्या गुरुंचा तपशील आहे. ज्यांच्यावर लहान मुलांचा लैंगिक छळ, खून, मालमत्ता हडपणं यासारखे गंभीर आरोप आहेत. आता तर इस्कॉनच्या प्रशासकीय समितीतच फूट पडली आहे. या फुटीच्या केंद्रस्थानी आहे इस्कॉनचं बंगळुरूतलं कोट्यवधी रुपयांचं मंदिर. आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोचला आहे. इस्कॉन बंगळुरू आणि इस्कॉन मुंबई एकमेकांवर मालमत्ता हडप करण्याचा कट रचल्याचा आरोप करत आहे. इस्कॉन मुंबई स्वतः वादात आहे. इथले मुख्य गुरू जयपताका स्वामी आणि प्रशासकीय समितीचे सदस्य दयाराम दास यांच्याविरुद्ध कोलकातातल्या कोर्टाने अटक वॉरंट बजावलं होतं. आपल्या एका भक्ताला विनाकारण बलात्कार प्रकरणात गोवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नंतर कलकत्ता हायकोर्टाने हे अटक वॉरंट रद्द केलं. इतकंच नाही तर दयाराम दास यांनी एक ई-मेलमध्ये विचारलं होतं. इस्कॉनचे माजी सदस्य सतध्यान दास यांच्यावर इस्कॉनच्या आवारात लहान मुलांचा लैंगिक छळ केल्याचे आरोप झाले होते. तरीही पोलिसांना त्याची माहिती का देण्यात आली नाही? सतध्यान दास यांनी इस्कॉनची बदनामी करण्यासाठी इस्कॉनवर आरोप केल्याचा दावा दयाराम दास यांनी आयबीएन-नेटवर्कशी बोलताना केला. इस्कॉन बंगळुरूचे प्रमुख मधू पंडित दास यांच्यावरही अफरातफर आणि गुन्हेगारी कटाचे आरोप आहेत. इस्कॉन बंगळुरूच्या प्रतिनिधींनी याबद्दल प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. पण, एकामागोमाग एक गंभीर आरोप होत असल्यानं इस्कॉनची प्रतिमा नक्कीच मलीन झाली आहे.इस्कॉन वादात- इस्कॉन मुंबईचे मुख्य गुरू जयपताका स्वामी, प्रशासकीय समिती सदस्य दयाराम दासविरुद्ध कोलकातातल्या कोर्टाचे अटक वॉरंट - आपल्या एका भक्ताला बलात्कार प्रकरणात गोवल्याचा आरोप - नंतर कलकत्ता हायकोर्टानं हे अटक वॉरंट रद्द केलंदयाराम दास यांचा ई-मेल'इस्कॉनचे माजी सदस्य सतध्यान दास यांच्यावर इस्कॉनच्या आवारात लहान मुलांचा लैंगिक छळ केल्याचे आरोप झाले होते. तरीही पोलिसांना त्याची माहिती का देण्यात आली नाही?'

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 05:03 PM IST

इस्कॉन संस्था वादात

28 एप्रिल

इस्कॉन म्हणून ओळखली जाणारी मुंबईतली इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस वादात सापडली आहे. या सोसायटीच्या सदस्यांवर अफरातफर आणि गुन्हेगारी कटाचे गंभीर गुन्हे आहेत. इस्कॉन...पाश्चिमात्य देशांना भगवान श्रीकृष्णाविषयी ज्ञान देणारी भारतातली अग्रगण्य संस्था...पण, आपली ही ओळख टिकवण्यासाठी इस्कॉन सध्या झगडतेय. घोटाळे, भ्रष्टाचार, आणि संस्थेतला अंतर्गत वाद, यामुळे इस्कॉन वादात सापडली आहे. इस्कॉनचं हे न्यूजलेटर...यात इथल्या गुरुंचा तपशील आहे. ज्यांच्यावर लहान मुलांचा लैंगिक छळ, खून, मालमत्ता हडपणं यासारखे गंभीर आरोप आहेत. आता तर इस्कॉनच्या प्रशासकीय समितीतच फूट पडली आहे. या फुटीच्या केंद्रस्थानी आहे इस्कॉनचं बंगळुरूतलं कोट्यवधी रुपयांचं मंदिर. आता हा वाद सुप्रीम कोर्टात पोचला आहे. इस्कॉन बंगळुरू आणि इस्कॉन मुंबई एकमेकांवर मालमत्ता हडप करण्याचा कट रचल्याचा आरोप करत आहे.

इस्कॉन मुंबई स्वतः वादात आहे. इथले मुख्य गुरू जयपताका स्वामी आणि प्रशासकीय समितीचे सदस्य दयाराम दास यांच्याविरुद्ध कोलकातातल्या कोर्टाने अटक वॉरंट बजावलं होतं. आपल्या एका भक्ताला विनाकारण बलात्कार प्रकरणात गोवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नंतर कलकत्ता हायकोर्टाने हे अटक वॉरंट रद्द केलं.

इतकंच नाही तर दयाराम दास यांनी एक ई-मेलमध्ये विचारलं होतं. इस्कॉनचे माजी सदस्य सतध्यान दास यांच्यावर इस्कॉनच्या आवारात लहान मुलांचा लैंगिक छळ केल्याचे आरोप झाले होते. तरीही पोलिसांना त्याची माहिती का देण्यात आली नाही?

सतध्यान दास यांनी इस्कॉनची बदनामी करण्यासाठी इस्कॉनवर आरोप केल्याचा दावा दयाराम दास यांनी आयबीएन-नेटवर्कशी बोलताना केला. इस्कॉन बंगळुरूचे प्रमुख मधू पंडित दास यांच्यावरही अफरातफर आणि गुन्हेगारी कटाचे आरोप आहेत. इस्कॉन बंगळुरूच्या प्रतिनिधींनी याबद्दल प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. पण, एकामागोमाग एक गंभीर आरोप होत असल्यानं इस्कॉनची प्रतिमा नक्कीच मलीन झाली आहे.इस्कॉन वादात- इस्कॉन मुंबईचे मुख्य गुरू जयपताका स्वामी, प्रशासकीय समिती सदस्य दयाराम दासविरुद्ध कोलकातातल्या कोर्टाचे अटक वॉरंट - आपल्या एका भक्ताला बलात्कार प्रकरणात गोवल्याचा आरोप - नंतर कलकत्ता हायकोर्टानं हे अटक वॉरंट रद्द केलं

दयाराम दास यांचा ई-मेल'इस्कॉनचे माजी सदस्य सतध्यान दास यांच्यावर इस्कॉनच्या आवारात लहान मुलांचा लैंगिक छळ केल्याचे आरोप झाले होते. तरीही पोलिसांना त्याची माहिती का देण्यात आली नाही?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close