S M L

राहुल गांधींनी उरकला अडीच तासात दुष्काळी दौरा

28 एप्रिलकाँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज सातारा जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा आटोपून दिल्लीला रवाना झाले आहे. आज सकाळी त्यांनी झाशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मात्र राहुल गांधींचा दुष्काळी दौरा अर्धवट सोडून दहिवडीहून पुणेमार्गे दिल्लीला रवाना झाले आहे. झाशी आणि तेथून ते पांगरीला गेले. मात्र त्यांनी नियोजित दौर्‍यात असलेल्या बिजवडी गावाला भेट न देताच राहुल गांधी दिल्लीला परतले. झाशी गावच्या दुष्काळग्रस्तांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी आम्हाला आश्वासनं नको, पाणी पाहिजे, अशी एकच मागणी ग्रामस्थांनी राहुल गांधींकडे केली. काही वर्षांपूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधींनीही या भागाचा दौरा केला होता. मात्र,त्यानंतर काहीही काम झालं नाही अशी तक्रारही त्यांनी राहुल गांधींकडे केली आणि तुम्ही काहीतरी बोला अशी गळही घातली. मात्र आपण बोलण्यासाठी नाही, तर ऐकण्यासाठी आलोय असं राहुल गांधींनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे पक्षप्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2012 10:33 AM IST

राहुल गांधींनी उरकला अडीच तासात दुष्काळी दौरा

28 एप्रिल

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज सातारा जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा आटोपून दिल्लीला रवाना झाले आहे. आज सकाळी त्यांनी झाशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मात्र राहुल गांधींचा दुष्काळी दौरा अर्धवट सोडून दहिवडीहून पुणेमार्गे दिल्लीला रवाना झाले आहे. झाशी आणि तेथून ते पांगरीला गेले. मात्र त्यांनी नियोजित दौर्‍यात असलेल्या बिजवडी गावाला भेट न देताच राहुल गांधी दिल्लीला परतले. झाशी गावच्या दुष्काळग्रस्तांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी आम्हाला आश्वासनं नको, पाणी पाहिजे, अशी एकच मागणी ग्रामस्थांनी राहुल गांधींकडे केली. काही वर्षांपूर्वी राजीव गांधी आणि सोनिया गांधींनीही या भागाचा दौरा केला होता. मात्र,त्यानंतर काहीही काम झालं नाही अशी तक्रारही त्यांनी राहुल गांधींकडे केली आणि तुम्ही काहीतरी बोला अशी गळही घातली. मात्र आपण बोलण्यासाठी नाही, तर ऐकण्यासाठी आलोय असं राहुल गांधींनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे पक्षप्रभारी मोहन प्रकाश उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2012 10:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close