S M L

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर गुन्हा दाखल

30 एप्रिलबहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पैशांचा अपहार केल्याप्रकरणी ईडीनं अशोक चव्हाण यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेचसीबीआयच्या तपासाच्या आधारावर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचा तपास संपल्यानंतर ईडी मालमत्ता जप्तीची कारवाई करणार आहे. 15 जूनपर्यंत सीबीआयचा तपास पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढची सुनावणी आता 18 जून रोजी होणार आहे. दोन आठवड्यांपूर्वीच न्यायालयीन समितीच्या आयोगाने विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांना दिलासा दिला होता. आदर्शची जमीन ही राज्य सरकारचीच आहे असं अहवालात सांगण्यात आलं आहे. यामुळे अशोकरावांनी सुटकेचा निश्वास सोडला होता मात्र आज ईडीने गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे अशोकरावांसह 13 जणांना अटक होण्याची शक्यता आहे.दरम्यान, आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैयालाल गिडवाणी आणि आर सी ठाकूर यांच्या सीबीआय चौकशीला कोर्टाने परवानगी दिली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तिथंच त्यांची पुढचे दोन दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चौकशी होणार आहे. आदर्शमधल्या सर्व 9 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 9 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 08:30 AM IST

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांवर गुन्हा दाखल

30 एप्रिल

बहुचर्चित आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. पैशांचा अपहार केल्याप्रकरणी ईडीनं अशोक चव्हाण यांच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेचसीबीआयच्या तपासाच्या आधारावर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचा तपास संपल्यानंतर ईडी मालमत्ता जप्तीची कारवाई करणार आहे. 15 जूनपर्यंत सीबीआयचा तपास पूर्ण होणार आहे. त्यानंतर पुढची सुनावणी आता 18 जून रोजी होणार आहे. दोन आठवड्यांपूर्वीच न्यायालयीन समितीच्या आयोगाने विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांना दिलासा दिला होता. आदर्शची जमीन ही राज्य सरकारचीच आहे असं अहवालात सांगण्यात आलं आहे. यामुळे अशोकरावांनी सुटकेचा निश्वास सोडला होता मात्र आज ईडीने गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे अशोकरावांसह 13 जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आदर्श घोटाळ्याप्रकरणी कन्हैयालाल गिडवाणी आणि आर सी ठाकूर यांच्या सीबीआय चौकशीला कोर्टाने परवानगी दिली आहे. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तिथंच त्यांची पुढचे दोन दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चौकशी होणार आहे. आदर्शमधल्या सर्व 9 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 9 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close