S M L

जि.प.मध्ये हस्तक्षेप करणार्‍या पालकमंत्र्यांना 5 हजारांचा दंड

30 एप्रिलकेंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर राज्यात दुसर्‍या मंत्र्यावर दंड भरण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याबद्दल भंडार्‍याचे पालकमंत्री रणजित कांबळे यांच्यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पाच हजाराचा दंड सुनावला आहे. मंत्रिमहोदयांनी स्वत:ला राजा आणि जिल्हा परिषद सदस्यांना स्वत:चे साधन मानले, अशा कडक शब्दात कोर्टाने कांबळे यांच्यावर ताशेरे ओढले आहे. याशिवाय मंत्र्यांचे आदेश निमूटपणे पाळणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कोर्टाने कडक शब्दात टीका केली. आणि चार वरिष्ठ अधिकार्‍यांवर प्रत्येकी दोन हजाराचा दंड ठोठावलाय. जिल्हा परिषदेच्या वित्त आणि कामकाज समितीचे अध्यक्ष चरणसिंह वाघमारे यांच्या याचिकेवर कोर्टाने हा दंड ठोठावला आहे. रणजित कांबळे यांनी वाघमारे यांच्याकडे दंडाची रक्कम भरली. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि ग्रामविकास सचिव, मुख्य कार्यपालन मंत्री, अतिरीक्त सीइओ यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये दंड भरला आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात आक्रमण करत कांबळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 30 कामांची यादी पाठवून परस्पर निधी मंजूर करुन घेतला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2012 11:27 AM IST

जि.प.मध्ये हस्तक्षेप करणार्‍या पालकमंत्र्यांना 5 हजारांचा दंड

30 एप्रिल

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर राज्यात दुसर्‍या मंत्र्यावर दंड भरण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याबद्दल भंडार्‍याचे पालकमंत्री रणजित कांबळे यांच्यावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पाच हजाराचा दंड सुनावला आहे. मंत्रिमहोदयांनी स्वत:ला राजा आणि जिल्हा परिषद सदस्यांना स्वत:चे साधन मानले, अशा कडक शब्दात कोर्टाने कांबळे यांच्यावर ताशेरे ओढले आहे.

याशिवाय मंत्र्यांचे आदेश निमूटपणे पाळणार्‍या प्रशासकीय अधिकार्‍यांवरही कोर्टाने कडक शब्दात टीका केली. आणि चार वरिष्ठ अधिकार्‍यांवर प्रत्येकी दोन हजाराचा दंड ठोठावलाय. जिल्हा परिषदेच्या वित्त आणि कामकाज समितीचे अध्यक्ष चरणसिंह वाघमारे यांच्या याचिकेवर कोर्टाने हा दंड ठोठावला आहे. रणजित कांबळे यांनी वाघमारे यांच्याकडे दंडाची रक्कम भरली. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि ग्रामविकास सचिव, मुख्य कार्यपालन मंत्री, अतिरीक्त सीइओ यांनी प्रत्येकी 2 हजार रुपये दंड भरला आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात आक्रमण करत कांबळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे 30 कामांची यादी पाठवून परस्पर निधी मंजूर करुन घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2012 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close