S M L

अरे देवाला तरी सोडा - अण्णा

01 मेदेवाच्या पवित्र ठिकाणी तरी लोकांनी नीट वागावे, मंदिरात काम करणार्‍यांनी तरी निदान भ्रष्टाचार करू नये अशी टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी साई ट्रस्टच्या कारभारावर केली. भ्रष्टाचार कमी करण्याची सरकारचीच इच्छाशक्ती नाही. लोकपालसाठी देशभर आंदोलन केले. जनता रस्त्यावर आली पण तरी सरकारला जाग आली नाही. या सरकारला धडा फक्त जनता शिकवू शकते. इकडे राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे यासाठी पोलीस यंत्रणा आणि मुख्यमंत्रीही लोकायुक्ताच्या कक्षेत यावेत, अशी मागणी अण्णांनी केली. जनलोकायुक्तासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला. अण्णा आज सकाळी राळेगणमधून निघाले. तिथल्या यादवबाबा मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. औक्षण झाल्यानंतर ते शिर्डीकडे रवाना झाले. शिर्डीत त्यांनी संध्याकाळी साईबाबांचं दर्शन घेतलं. आणि संध्याकाळी या दौर्‍यातली आपली पहिली सभा घेतली. अण्णांच्या या पहिल्याच सभेला भाजपचं पाठबळ असल्याची चर्चा आहे. अण्णांची सभा यशस्वी होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडद्या मागे तयारी केल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2012 04:35 PM IST

अरे देवाला तरी सोडा - अण्णा

01 मे

देवाच्या पवित्र ठिकाणी तरी लोकांनी नीट वागावे, मंदिरात काम करणार्‍यांनी तरी निदान भ्रष्टाचार करू नये अशी टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी साई ट्रस्टच्या कारभारावर केली. भ्रष्टाचार कमी करण्याची सरकारचीच इच्छाशक्ती नाही. लोकपालसाठी देशभर आंदोलन केले. जनता रस्त्यावर आली पण तरी सरकारला जाग आली नाही. या सरकारला धडा फक्त जनता शिकवू शकते. इकडे राज्यात भ्रष्टाचार फोफावला आहे यासाठी पोलीस यंत्रणा आणि मुख्यमंत्रीही लोकायुक्ताच्या कक्षेत यावेत, अशी मागणी अण्णांनी केली.

जनलोकायुक्तासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला. अण्णा आज सकाळी राळेगणमधून निघाले. तिथल्या यादवबाबा मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. औक्षण झाल्यानंतर ते शिर्डीकडे रवाना झाले. शिर्डीत त्यांनी संध्याकाळी साईबाबांचं दर्शन घेतलं. आणि संध्याकाळी या दौर्‍यातली आपली पहिली सभा घेतली. अण्णांच्या या पहिल्याच सभेला भाजपचं पाठबळ असल्याची चर्चा आहे. अण्णांची सभा यशस्वी होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पडद्या मागे तयारी केल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2012 04:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close