S M L

प्राध्यापकांचा पेपर तपासणी बहिष्कारावर आज तोडगा ?

02 एप्रिलराज्यातील 10 विद्यापीठांच्या प्राध्यापकांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे आजच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी याविषयी चर्चा करतील. त्यानंतर आंदोलन करणार्‍या प्राध्यापकांशी बोलणी होईल. त्यामुळे आज या आंदोलनावर तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. मागिल महिन्यापासून राज्यातल्या 10 विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे टीवाय बीए, बीकॉम, बीएससी च्या लाखो पेपर तपसणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. राज्यभरातले 30 हजारहून अधिक प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्राध्यापकांच्या मागण्या - एप्रिल 2009 ते जानेवारी 2010 काळातील सहाव्या वेतन आयोगाची रोख रक्कम थकबाकी राज्यसरकारकडून त्वरित मिळावी- जानेवारी 2006 ते मार्च 2009 मधील सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळावेत- 1991 ते 2000 याकाळात नेट-सेट ची परीक्षा न दिलेल्या प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली होती या प्राध्यापकांना सेवेत कायम करावेदरम्यान, 'महाराष्ट्र नेट सेट पात्रता धारक समन्वय समिती'ने आज राजभवनवर कुलपतींची भेट घेतली. प्राध्यापकांच्या संघटनेने 1991 ते 2000 च्या काळात नेट सेट न दिलेल्या प्राध्यापकांना कायम करायची मागणी केली आहे ती मंजूर करु नये अशी मागणी या समितीने केली आहे. याबाबत सरकारला कायदेशीर नोटीसही दिल्याची माहिती समितीचे प्रमुख प्राध्यापक अजय दरेकर यांनी आयबीएन लोकमतला दिली. प्राध्यापकांच्या समितीने केलेल्या या मागणीमुळे प्राध्यापक आणि सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादाला एक नवं वळण मिळालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 2, 2012 09:34 AM IST

प्राध्यापकांचा पेपर तपासणी बहिष्कारावर आज तोडगा ?

02 एप्रिल

राज्यातील 10 विद्यापीठांच्या प्राध्यापकांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे आजच्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी याविषयी चर्चा करतील. त्यानंतर आंदोलन करणार्‍या प्राध्यापकांशी बोलणी होईल. त्यामुळे आज या आंदोलनावर तोडगा निघेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. मागिल महिन्यापासून राज्यातल्या 10 विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे टीवाय बीए, बीकॉम, बीएससी च्या लाखो पेपर तपसणीला अजूनही सुरुवात झालेली नाही. राज्यभरातले 30 हजारहून अधिक प्राध्यापक या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

प्राध्यापकांच्या मागण्या - एप्रिल 2009 ते जानेवारी 2010 काळातील सहाव्या वेतन आयोगाची रोख रक्कम थकबाकी राज्यसरकारकडून त्वरित मिळावी- जानेवारी 2006 ते मार्च 2009 मधील सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळावेत- 1991 ते 2000 याकाळात नेट-सेट ची परीक्षा न दिलेल्या प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली होती या प्राध्यापकांना सेवेत कायम करावे

दरम्यान, 'महाराष्ट्र नेट सेट पात्रता धारक समन्वय समिती'ने आज राजभवनवर कुलपतींची भेट घेतली. प्राध्यापकांच्या संघटनेने 1991 ते 2000 च्या काळात नेट सेट न दिलेल्या प्राध्यापकांना कायम करायची मागणी केली आहे ती मंजूर करु नये अशी मागणी या समितीने केली आहे. याबाबत सरकारला कायदेशीर नोटीसही दिल्याची माहिती समितीचे प्रमुख प्राध्यापक अजय दरेकर यांनी आयबीएन लोकमतला दिली. प्राध्यापकांच्या समितीने केलेल्या या मागणीमुळे प्राध्यापक आणि सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादाला एक नवं वळण मिळालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2012 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close