S M L

विधान परिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

07 मेमहापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेला संघर्ष थांबवत दोन्ही पक्षांनी विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निवडणुकतही आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये आता बंडखोरी झाली आहे. परभणी पाठोपाठ नाशिकमध्येही काँग्रेसच्या नेत्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. परभणी आणि नाशिकच्या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. मात्र, परभणीत काँग्रेसचे विद्यमान उमेदवार सुरेश देशमुख यांनी अर्ज भरला. तर नाशिकमध्ये माणिक कोकाटे गटाचे राजेंद्र चव्हाण हे अर्ज भरत आहेत. दरम्यान, बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यायला सांगण्यात येणार आहे, आणि ते मागे घेतील असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 08:30 AM IST

विधान परिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

07 मे

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेला संघर्ष थांबवत दोन्ही पक्षांनी विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निवडणुकतही आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये आता बंडखोरी झाली आहे. परभणी पाठोपाठ नाशिकमध्येही काँग्रेसच्या नेत्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली आहे. परभणी आणि नाशिकच्या जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. मात्र, परभणीत काँग्रेसचे विद्यमान उमेदवार सुरेश देशमुख यांनी अर्ज भरला. तर नाशिकमध्ये माणिक कोकाटे गटाचे राजेंद्र चव्हाण हे अर्ज भरत आहेत. दरम्यान, बंडखोरांना उमेदवारी मागे घ्यायला सांगण्यात येणार आहे, आणि ते मागे घेतील असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close